जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / मेकअपशिवाय अशी दिसते अक्षय कुमारची अभिनेत्री, एका क्षणात तुम्हीही ओळखू शकणार नाही

मेकअपशिवाय अशी दिसते अक्षय कुमारची अभिनेत्री, एका क्षणात तुम्हीही ओळखू शकणार नाही

मेकअपशिवाय अशी दिसते अक्षय कुमारची अभिनेत्री, एका क्षणात तुम्हीही ओळखू शकणार नाही

झगमगत्या दुनियेत तुम्हाला फार क्वचितच असे कलाकार दिसतील जे मेकअपशिवाय फिरतात. जिकडे ते मेकअपशिवाय फिरत नाहीत तिकडे सोशल मीडियावर फोटो टाकण्याचा तर प्रश्नच येत नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई,01 जून- झगमगत्या दुनियेत तुम्हाला फार क्वचितच असे कलाकार दिसतील जे मेकअपशिवाय फिरतात. जिकडे ते मेकअपशिवाय फिरत नाहीत तिकडे सोशल मीडियावर फोटो टाकण्याचा तर प्रश्नच येत नाही. काही दिवसांपूर्वी सोनम कपूरने तिचा मेकअपशिवायचा फोटो शेअर केला होता. तिच्यानंतर आता अजून एका अभिनेत्रीने मेकअपशिवायचा फोटो शेअर केला आहे. जोरदार हवेने ‘या’ अभिनेत्रीला दिला त्रास, असा सांभाळावा लागला ड्रेस आम्ही बोलतोय ते सिंघम फेम अभिनेत्री काजल अग्रवालबद्दल. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव काजल अग्रवालने तिचा मेकअपशिवायचा फोटो सोशल मीडियावर शएअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शन लिहिलं की, ‘लोक स्वतःला अजून शोधू शकत नाहीत. आपण अशा जगात वावरतोय जिथे बाह्य रुपला अधिक महत्त्व दिलं जातं. जास्तीत जास्त सुंदर दिसण्यासाठी लोक वाटेल ते करायला तयार आहेत. कारण सोशल मीडियावर अशा सौंदर्याचं कौतुक केलं जातं. लाखो रुपये खर्च करून सौंदर्य प्रसादनं विकत घेतली जातात.’

    जाहिरात

    …म्हणून आमिर खानच्या ऑफिससमोरच चाहत्याने केला आत्महत्येचा प्रयत्न काजलने पुढे लिहिले की, ‘आत्मशांती सगळीकडे फार महत्त्वाची आहे. आपण कोण आहोत याचा स्वीकार करून आयुष्यात पुढे गेलो तरच आपण जास्त समाधानी आणि आनंदी राहू शकू. मेकअप आपल्याला सुंदर दिसण्यासाठी मदत करत असला तरी एक व्यक्ती म्हणून तो आपल्याला सुंदर करू शकतो का? आपलं चरित्र बदलतं का? आपण जसे आहोत तसं स्वीकारता आलं पाहिजे.’

    जाहिरात

    Bigg Boss Marathi 2- आज अभिजित बिचुकलेची महेश मांजरेकर घेणार का शाळा? काजलच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच बॉलिवूड सिनेमा क्वीनच्या तमिळ रिमेकमध्ये दिसणार आहे. पेरिस- पेरिस असं या सिनेमाचं नाव असून रमेश अरविंद यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तमिळ सिनेमांसोबतच काजलने अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. अक्षय कुमारच्या स्पेशल २६, अजय देवगणच्या सिंघन सिनेमात तिची महत्त्वपूर्ण भूमिका होती. काही दिवसांपूर्वी सोनमने आपला मेकअपशिवायचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ‘मेकअपशिवाय..’ असं कॅप्शन दिलं होतं. ३३ वर्षीय सोनमने फोटोमध्ये मजेंडा रंगाचा ड्रेस घातला होता तर तिचे केस मोकळे होते. दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरने रिक्रिएट केलं बलम पिचकारी गाणं, तुम्ही पाहिलात का VIDEO? VIDEO: धक्कादायक! इडली बनवण्यासाठी शौचालयातील पाण्याचा वापर

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात