मुंबई, 01 जून- आपल्या विनोदबुद्धीने सर्वांना खळखळून हसवणारा बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने आपल्या लुकमध्ये थोडे बदल केले आहेत. नेमकी याच कारणामुळे तो सध्या ट्रोल होत आहे. रितेशने पत्नी जेनेलिया देशमुखला सरप्राइज देण्यासाठी आपला लुक बदलला. जेनेलियानेही अतिशय प्रेमाने त्याचा हा लुक इन्स्टाग्रामवर शेअर करून त्याचं कौतुकही केलं. पण रितेश आणि जेनेलियाच्या चाहत्यांना त्यांचा हा लुक फारसा आवडला नाही. यामुळेच त्यांनी रितेशला ट्रोल करायला सुरुवात केली.
रितेशचा सध्या रेड स्क्वॉइरल टेल लुक चर्चेत आहे. जेनेलियाने रितेशची नवी हेअर स्टाइलचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत म्हटलं की, ‘मी रितेशला म्हटलं होतं की मला त्याचा नवा लुक पाहायचा आहे. त्याने चक्क रेड स्क्वॉइरल टेलचाच लुक केला. हे चांगलं नाहीये का?’
जोरदार हवेने 'या' अभिनेत्रीला दिला त्रास, असा सांभाळावा लागला ड्रेस
...म्हणून आमिर खानच्या ऑफिससमोरच चाहत्याने केला आत्महत्येचा प्रयत्न
जेनेलियाच्या या प्रश्नावर अनेकांनी मजेशीर उत्तर दिली. अनेकजण रितेशच्या या लुकवर नाखुश दिसले. एका युझरने लिहिले की, ‘या फोटोमध्ये त्या टेलशिवाय प्रत्येक गोष्ट नीट आहे.’ तर अजून एका युझरने लिहिले की, ‘ही तर पोपटाची चोच वाटते.’ एकाने रितेशला गे असंही संबोधलं.
जान्हवी कपूरकडे असते की गुलाबी बाटली, किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क
रितेशच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच तो मल्टीस्टारर हाउसफुल ४ सिनेमांत दिसणार आहे. याशिवाय मरजावां सिनेमात दिसणार आहे. यात त्याच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्राही असणार आहे. सिद्धार्थ आणि रितेश यांनी एक विलन सिनेमात एकत्र काम केलं आहे.
VIDEO: धक्कादायक! इडली बनवण्यासाठी शौचालयातील पाण्याचा वापर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Riteish Deshmukh