• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • वाढदिवशी रणवीर सिंगची चाहत्यांना गोड भेट; नव्या भूमिकेसाठी सज्ज

वाढदिवशी रणवीर सिंगची चाहत्यांना गोड भेट; नव्या भूमिकेसाठी सज्ज

अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या वाढदिवशीच चाहत्यांना गोड भेटवस्तू दिली आहे.

 • Share this:
  मुंबई 6 जुलै: अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण वाढदिवशीच (Ranveer Singh birthday) त्याने चाहत्यांना एक गोड भेट दिली आहे.  रणवीर एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा टिझर शेअर करत त्याने ही बातमी दिली. विशेष म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सोबत दिसणार आहे. 2019 साली त्या दोघांचा ‘गली बॉय’ (Gully Boy) हा चित्रपट आला होता जो प्रंचड लोकप्रिय झाला होता. याशिवाय त्यांची केमिस्ट्री ही सुपरहिट ठरली होती. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.
  प्रसिध्द दिग्दर्शक, निर्माता करण जोहर (Karan Johar) या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. नुकतच करण ने तो दिग्दर्शनात परतणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता या चित्रपटाची अधिकृत घोषणा करत टिझर ही प्रदर्शित करण्यात आला.

  अतरंगी रणवीरची भन्नाट फॅशन; हे लूक्स पाहून तुम्हीही खळखळून हसाल

  रणवीरने सोशल मीडिया वर ही पोस्ट करत कॅप्शन लिहीत ही माहिती दिली. त्यामुळे रणवीर आलियाच्या चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणीच ठरणार आहे. ‘रॉकी और राणी की प्रेमकहानी’ (Rocky Aur Rani Ki Premkahani) असं या चित्रपटांचं नाव आहे. कऱम जोहर स्वतः हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. बिग बॉस फेम राहुल वैद्य अडकणार विवाहबंधनात; या मूहुर्ताला दिशासोबत बांधणार लग्नगाठ याशिवाय धर्मा प्रोडक्शनच्याच (Dharma Production) आणखी एका चित्रपटातही रणवीर आलिया दिसणार आहेत. पण अद्याप त्याची कोणतीही अपडेट आलेली नाही. 2020 मध्ये करण जोहरने धर्मा प्रोडक्शनचाच ‘तख्त’ हा मल्टी स्टारर चित्रपट घोषित केला होता. पण अद्याप चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं नसल्याचं समजतं आहे.
  Published by:News Digital
  First published: