बिग बॉस फेम आभिनेता , गायक राहूल वैद्य लवकरच लग्न करत आहे. दीर्घकाळ राहिलेली प्रेयसी दिशासोबत तो विवाह करणार आहे.
राहुल आणि दिशा बिगबॉसनंतर फारच चर्चेत आले होते. या जोडीच्या लग्नाची त्यांच्या चाहत्यांना फारच उत्सुकता होती.
राहुल आणि दिशाची २०१८मध्ये पहिल्यांदा ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.