बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या हिट चित्रपटांइतकाच त्याच्या फॅशनसाठीही प्रसिद्ध आहे. त्याचे काही हटके लुक्स नेहमीच साऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. रणवीर कधी कोणती फॅशन करेन याचा काही नेम नाही. रणवीरला नेहमीच काहीतरी वेगळी आणि हटके फॅशन करायला आवडते. या लुकमध्ये तर तो रंगीबेरंगी कपडे परिधान केलेला दिसत आहे. त्यामुळे त्याची फॅशन पाहून नेहमीच चर्चा असते. त्याच्या कपड्यांमुळे तो ट्रोलही होतो. पण अनेकांना त्याचा हा अंदाज आवडतो देखील. रणवीर हे भन्नाट लुक्स सोशल मीडियावरही फारच व्हायरल होताना दिसतात. सोशल मीडियावर रणवीरच्या या लुक्सची मोठी चर्चा असते.