मुंबई, 15 डिसेंबर - बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंह(Ranveer Singh) त्याची पत्नी दीपिका पदुकोणसोबत (Deepika padukone) नुकताच मुंबई विमानतळावर दिसला. जिथे दीपिका ब्लॅक अँड व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. दुसरीकडे, रणवीर सिंग पिवळ्या आणि लाल रंगाच्या अतरंगी लुकमध्ये म्हणजे त्याच्याच जुन्या स्टाइलमध्ये दिसला. मग काय रणवीर सिंह पुन्हा एकदा त्याच्या ड्रेसमुळे ट्रोल झाला होता. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांला कार्टून, जोकर आणि प्राणी म्हणू लागले. तसेच रणवीरने दीपिकाचे एअरपोर्टवर खुलेआम किस देखील केले. यावरही यूजर्स त्याला ट्रोल करत आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ (Vicky Kaushl Katrina Kaif) यांच्यासमोर त्यांना असुरक्षित वाटत असल्याने त्यांनी हे केले असे लोकांना वाटते. यावरून नेटकऱ्यांनी या जोडीला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.
पापाराझी व्हायरल भयानीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दीपिका कारमधून खाली उतरताच रणवीर सिंग तिला घेण्यासाठी येतो. त्यानंतर तेथे उपस्थित असलेले पापाराझी देखील या कपलचा फोटो क्लिक करण्यास सुरूवात करतात. त्यानंतर दोघेही कॅमेऱ्यासमोर पोझ देतात.
रणवीरने दीपिकाला केले खुलेआम किस
त्याचवेळी पापाराझी म्हणतात की, तुमचा '83' चित्रपट हिट आहे. मग अचानक रणवीर म्हणतो, 'माझ्या चित्रपटाची निर्माती तर ही आहे'. असे बोलून रणवीर लगेच दीपिकाला किस करतो. यानंतर पापाराझी 'वन्स मोअर, वन्स मोअर' ओरडायला लागतात. पण दोघेही हसत पुढे गेले.
View this post on Instagram
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सोशल मीडिया यूजर्सनी रणवीर सिंह-दीपिका पदुकोणला ट्रोल करायला सुरुवात केली. विकी-कॅटच्या लोकप्रियतेसमोर रणवीर-दीपिका असुरक्षित वाटत असल्याची प्रतिक्रिया अनेक युजर्सनी दिली. एका यूजरने कमेंट केली आहे की, 'विकी आणि कतरिनाच्या लोकप्रियतेच्या पुढे दोघेही काही नाहीत.' तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'विकी-कॅटच्या साधेपणासमोर दोघेही फिके पडले आहेत.
वाचा : Ankita-Vicky Wedding: अंकिता लोखंडेने विकी जैनसोबत बांधली लग्नगाठ
नुकतेच कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नानंतर सार्वजनिकरित्या स्पॉट झाले होते. या जोडप्याने अतिशय शाही पद्धतीने लग्न केले होते. लग्नानंतर, जेव्हा ते पहिल्यांदा लोकांसमोर आले तेव्हा ते अगदी साध्या ड्रेसमध्ये होते. या जोडप्याची ही शैली लोकांना आवडली.
वाचा : 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेच्या 'त्या' दृश्यावर प्रेक्षकांचा संताप; मालिका बंद
वर्कफ्रंटवचे सांगायचे तर रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण लवकरच '83' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे, तर दीपिका त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीर सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Deepika padukone, Entertainment, Katrina kaif, Ranveer singh, Vicky kaushal