मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेच्या 'त्या' दृश्यावर प्रेक्षकांचा संताप; मालिका बंद करण्याची होतेय मागणी

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेच्या 'त्या' दृश्यावर प्रेक्षकांचा संताप; मालिका बंद करण्याची होतेय मागणी

  'सुंदरा मनामध्ये भरली'   (Sundara Manamdhe Bharali)   ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अभ्या आणि लतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच पसंत पडते.

'सुंदरा मनामध्ये भरली' (Sundara Manamdhe Bharali) ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अभ्या आणि लतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच पसंत पडते.

'सुंदरा मनामध्ये भरली' (Sundara Manamdhe Bharali) ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अभ्या आणि लतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच पसंत पडते.

मुंबई, 15 डिसेंबर-   'सुंदरा मनामध्ये भरली'   (Sundara Manamdhe Bharali)   ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अभ्या आणि लतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच पसंत पडते. चाहते नेहमीच या मालिकेचं भरभरून कौतुक करत असतात. मात्र नुकतंच असं काही घडलं आहे. ज्यामुळे प्रेक्षक या मालिकेवर आक्षेप घेत आहेत. हे सर्व मालिकेतील एका दृश्यामुळे घडलं आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण

कलर्स मराठीवर 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका रोज आपल्याला पाहायला मिळते. या मालिकेने अल्पावधीतच मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र आज प्रेक्षक या मालिकेवर नाराज झाले आहेत. मालिकेत दाखवण्यात आलेल्या एका क्रूर आणि हिंसक दृश्यामुळे प्रेक्षक संतापले आहेत. आणि या मालिकेचा विरोध करत आहेत. नुकताच या मालिकेचा एका नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये अभ्याची आई आणि दौलत यांच्यामध्ये वादावादी झालीच दाखवलं गेलं आहे. त्यांनतर दौलत अभ्याच्या आईसोबत अत्यंत हिंसक पद्धतीने वागतो. हे प्रेक्षकांना अजिबात रुचलं नाहीय.

कलर्स मराठी वाहिनीने नुकताच 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेचा एक प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये अभ्याची आई दौलतला आपल्या घरातून निघून जाण्यास सांगते. तसेच हे घर फक्त आपलं असल्याचं आणि त्याच्यावर इतर कोणीही हक्क गाजवू शकत नसल्याचं ठणकावून सांगत असते. मात्र अतिशय लाडावलेला आणि उद्धट असणारा आमदाराचा मुलगा दौलत त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही, तो जबरदस्ती त्यांच्या घरामध्ये हक्क दाखवायला चालू करतो. अभ्याची आई आपल्या घरावर दौलतीच्या नावाची पाटी पाहून संतापते आणि ती फोडून काढण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी दौलत हिंसा करू लागतो. तो त्या धक्का देऊन खाली पडतो. तो इतक्यावरच थांबत नाही. तर त्यांचा अस्थमा पंप पायाने तुडवतो आणि त्यांना तो उचलून घेऊ देत नाही. त्यामुळे त्यांची स्थिती खालावते.

(हे वाचा:Bigg Boss Marathi: 'बी टीम' मध्ये पडली फूट! विशाल-विकास, मीनल-सोनाली अशी झाली.. )

हा प्रोमो समोर येताच प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत. कमेंट करून युजर्स आपली नाराजी व्यक्त करत आहेत. मालिकेत दाखवण्यात आलेल्या या दृश्यावर प्रचंड प्रमाणात टीका केली जात आहे. काहींनी तर मालिकेच्या लेखिकेला मनोरुग्ण म्हटलं आहे. युजर्स विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. इतकंच नव्हे तर आता मालिका बंद करण्याचा सल्ला सगळे देत आहेत.

First published:

Tags: Marathi entertainment