मुंबई, 14 डिसेंबर : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकले. मंगळवारी संध्याकाळी हे जोडपं विवाहबद्ध झालं. 11 डिसेंबरच्या रात्री पासूनच अंकता आणि विकीच्या विवाहसोहळ्याला सुरुवात झाली. मेहेंदी, हळदी, एंगेजमेंटपासून भव्य कॉकटेल पार्टीपर्यंत सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्यांना कुटुंबातील सदस्य, मित्र आणि सिनेइंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. या विवाह सोहळ्यात विकी जैनने ग्रँड एन्ट्री केली. नववधू अंकिता लोखंडेला घेण्यासाठी तो विंटेज कारमधून मिरवणुकीने पोहोचला. यावेळी अंकिता विकी जैनला पाहून भावुक होते आणि त्याला घट्ट मिठी मारते. मराठी रितीरिवाजानुसार मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. वाचा: PHOTOS: अंकिता लोखंडेच्या संगीतमध्ये पंगा क्वीन कंगना रणौतची हजेरी! विवाह समारंभात अंकिताने सोनेरी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती, तर विकीही पांढऱ्या शेरवानीमध्ये डॅशिंग दिसत होता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विकी आणि अंकिता पूजा करताना आणि एकमेकांना पुष्पहार घालताना दिसत आहेत वाचा: अंकिता लोखंडे-विकी जैननं रद्द केली आपली रिसेप्शन पार्टी! ‘या’ कारणाने घेतला…. या सोहळ्यात आधी मेहंदी समारंभ झाला, त्यानंतर हळदी आणि संगीत कार्यक्रम झाला. सेलिब्रिटी मेहंदी कलाकार वीणा नागदा हिने अंकिता लोखंडेला मेंदी लावली होती. अंकितासोबत तिच्या वरालाही वीणा नागदा यांनीच मेहंदी लावली. यानंतर झालेल्या संगीत सोहळ्यात खूप धमाल झाली.
दरम्यान, अंकिताचा विवाह संपन्न झाल्याने तिच्या चाहत्यांची प्रतीक्षाही आता संपली आहे. गेल्या काही काळापासून अंकिताच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर ती मिसेस जैन बनली आहे.

)







