जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / रणदीप हुड्डाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली मदत, म्हणाला 'लवकरात लवकर अॅक्शन घ्या' Randeep Hooda | PM Narendra Modi | Amit Shah

रणदीप हुड्डाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली मदत, म्हणाला 'लवकरात लवकर अॅक्शन घ्या' Randeep Hooda | PM Narendra Modi | Amit Shah

रणदीप हुड्डाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली मदत, म्हणाला 'लवकरात लवकर अॅक्शन घ्या' Randeep Hooda | PM Narendra Modi | Amit Shah

Randeep Hooda | PM Narendra Modi | Amit Shah तिथे उपस्थित आमदारांच्या गुंडांनी महिलावर काठीने हल्ला केला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 जुलै- तेलंगनामध्ये रविवारी एक हृदयद्रावक घटना पाहायला मिळाली. अनधिकृत शेती करण्यापासून रोखल्यामुळे वनविभागाच्या एका महिला पोलीस अधिकाऱ्यांना निघृणपणे मारण्यात आले. या प्रकरणी स्थानिक मंत्र्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच एक लांबलचक मेसेज लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तेलंगना येथे महिला पोलीस अधिकाऱ्याला काठ्यांनी मारहाण करण्यात आली. यात तेलंगना येथील सत्ताधारी पार्टी तेलंगाना राष्ट्री समितीचे आमदार कोनेरु कृष्ण यांच्या भावावर मारपीट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रणदीपने महिलेला मारहाण करणारा हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, ‘राज्यातील पोलिसांवर हल्ला करणं म्हणजे राज्यावर हल्ला करण्यासारखं आहे. वन विभागातील महिला पोलीस कर्मचाऱ्याला तेलंगणातील कागजनगर येथे आमदारच्या भावाने आणि त्याच्या गुंडांनी निघृण मारहाण केली.’ आई मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या नात्यावर मुलगा अरहानने दिली अशी रिअॅक्शन

स्मोकिंग करताना दिसला नवरा करण सिंग ग्रोवर, बिपाशा म्हणाली… रणदीप हुड्डाने पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, ‘पोलीस येथे तीन महिन्यांपासून सुरू असणाऱ्या अवैध्य शेती रोखण्यासाठी गेले होते. सरकारच्या ट्रॅक्टरवर महिला पोलीस बसली होती. मात्र तिथे उपस्थित आमदारांच्या गुंडांनी महिलावर काठीने हल्ला केला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. अशीच एक घटना तापेशवर सेंचुरी येथेही घटली होती. इथे स्थानिक आमदाराच्या सांगण्यावरून हे करण्यात आलं होतं.’ रणदीप हुड्डाने आपल्या या पोस्टच्या शेवटी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरसह भाजपच्या अनेक नेत्यांना टॅग केलं आहे. तसेच या घटनेवर लगेच अॅक्शन घेण्याची मागणीही त्याने केली आहे. रणदीपच्या या पोस्टवर त्याच्या अनेक चाहत्यांनीही त्यांचं मत स्पष्ट केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाला टीव्ही शोमधील बाथटब रोमान्स, पाहा VIDEO रणदीप हुड्डाच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, मुंबई पोलिसांतील प्रसिद्ध एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे. प्रदीप खैरवार हे या दिग्दर्शन करणार आहेत. प्रदीप यांनी राम गोपाल वर्माकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. जेजुरीत माऊलींच्या पालखीचा मुक्काम, पाहा गडाचा अवर्णनीय Exclusive VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात