मुंबई, 01 जुलै- स्टार प्लसवरील सर्वात प्रसिद्ध दिव्य दृष्टी ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील सुपर नॅचरल कथेमुळे प्रेक्षकांमध्ये ही मालिका कुतूहल निर्माण करत आहे. मालिकेत कपल दाखवण्यात आलेले रक्षित (आद्विक महाजन) आणि दृष्टी (सना सय्यद) यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना तुफान आवडत आहे. दरम्यान मालिकेच्या दिग्दर्शकाने दोघांमध्ये एक रोमँटिक सीन शूट केला. नुकतेच या सीनचे काही क्लिप समोर आले आहेत. या बोल्ड रोमँटिक क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
आई मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या नात्यावर मुलगा अरहानने दिली अशी रिअॅक्शन रक्षित आणि दृष्टी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेला रोमँटिक सीन बाथटममधला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दृष्टी काळ्या साडीत बाथटबमध्ये बसलेली दिसते. तर रक्षितने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. इन्स्टाग्रामवर एका चाहतीने हे दोन्ही रोमँटिक व्हिडिओ शेअर केले आहेत. या सीनमध्ये अनेक बॉलिवूड गाणी आहेत. यात रक्षित आणि दृष्टी यांचा किसिंग सीनही दाखवण्यात आला आहे. किसिंग सीनच्या आधी रक्षित बेशुद्ध असतो. रक्षितचे ओठ काळे- निळे पडले होते. त्याची ही अवस्था पाहून दृष्टी फार भावुक झाली होती. मालिकेमध्ये दोघांमधलं प्रेम हळू हळू रंगत जाताना दिसत आहे. मालिकेत रक्षित आणि दृष्टी अर्थात आद्विक आणि सना पती- पत्नीच्या भूमिकेत आहेत.
स्मोकिंग करताना दिसला नवरा करण सिंग ग्रोवर, बिपाशा म्हणाली… ही मालिका त्याच्या वेगळ्या कथानकामुळे चर्चेत राहिली आहे. अभिनेत्री मानसी श्रीवास्तवच्या व्यक्तिरेखेला पाल बनवण्यात आले आहे. नेमकी ही गोष्ट प्रेक्षकांना आवडत नाहीये. पाल होऊन मानसीला रक्षित याला दंश करून मारण्याचा हेतू असतो. नेमकी हीच गोष्ट फार हास्यास्पद असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. दिव्य दृष्टी या मालिकेत दोन बहिणींची कथा सांगण्यात आली आहे. त्यातील एका बहिणीचं नाव दिव्य तर दुसऱ्या बहिणीचं नाव दृष्टी असतं. या दोन्ही बहिणींकडे सुपर नॅचरल पावर असते. जेजुरीत माऊलींच्या पालखीचा मुक्काम, पाहा गडाचा अवर्णनीय Exclusive VIDEO

)







