स्मोकिंग करताना दिसला नवरा करण सिंग ग्रोवर, बिपाशा म्हणाली... Bipasha Basu | Karan Singh Grover |

News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2019 07:27 AM IST

स्मोकिंग करताना दिसला नवरा करण सिंग ग्रोवर, बिपाशा म्हणाली... Bipasha Basu | Karan Singh Grover |

मुंबई, 30 जून- अभिनेत्री बिपाशा बासु आणि करण सिंग ग्रोवर बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपलपैकी एक आहेत. दोघं अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. त्यातही दोघं फिटनेसमुळे सर्वात जास्त चर्चेत असतात. सिनेमात काम केल्यानंतर करण पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळला आहे. सध्या तो एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की २' मालिकेत मिस्टर बजाज ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या सगळ्यात बिपाशाने करणचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत त्याला एक विनंती केली आहे.

 

Loading...

View this post on Instagram

 

Miss you already ... come back soonly 😘❤️ #smissyou #monkeylove #cuddlepumpkin #cutiepatootie #papabumba

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu) on

शाहरुख खानने चालवली बाइक तर सचिन तेंडुलकरने दिला सल्ला, पाहा VIDEO

बिपाशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये करण सिक्स पॅक दाखवताना दिसत आहे. करण या फोटोत फार हॉट दिसतो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. लुकशिवाय या फोटोत तो सिगरेट ओढताना दिसत आहे. बिपाशाला करणची नेमकी हीच गोष्ट आवडली नाही. हा फोटो शेअर करताना बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नो स्मोकिंग प्लीज.’

भारत- इंग्लंड सामन्यात ऋषी कपूर यांनी केले मजेशीर ट्वीट, पाकिस्तानी चाहते भडकले

बिपाशाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने शेवटचे 'अलोन' सिनेमात काम केले होते. पण हा भयपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला होता. यानंतर बिपाशा मोठ्या पडद्यापासून दूर झाली. मात्र असे असले तरी कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाला आणि सोहळ्यांना ती हमखास दिसते. मीडिया रिपोर्टनुसार बिपाशा आणि करण दोघं विक्रम भट्ट यांच्या 'आदत' सिनेमात एकत्र दिसणार आहेत. सध्या विक्रम सिनेमाच्या कथेवर काम करत आहेत. बिपाशा आणि करणची लव्ह स्टोरी अलोन सिनेमापासूनच सुरू झाली होती. यानंतर दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं आणि अखेर २०१६ मध्ये राजेशाही थाटात बंगाली पारंपरिक पद्धतीने लग्न केलं.

VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2019 07:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...