मुंबई, 30 जून- सध्या बी- टाउनमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या नात्याचीच सर्वात जास्त चर्चा आहे. नुकतेच दोघं न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटायला गेले होते. दरम्यान, दोघांचे तिथले अनेक फोटो व्हायरल झाले होते. अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम फोटोंमधून त्याचं मलायकावरील प्रेम भरभरून व्यक्त केलं. नुकतंच मलायकाने एका मुलाखतीत आपल्या नात्याशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तसेच अर्जुन आणि तिच्या वयातील अंतरावरही मलायका मनमोकळेपणाने बोलली.
एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत मलायकाने घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा प्रेम मिळवणं फार खास असल्याचं सांगितलं. या मुलाखतीत मलायकाने ही एक कमाल फिलिंग असल्याचं मान्य केलं. जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा मला माहीत नव्हतं की दुसऱ्यांदा मला नात्यात जायचं आहे की नाही. पण मला स्वतःला दुसरी संधी द्यायची होती. मी योग्य निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे.
शाहरुख खानने चालवली बाइक तर सचिन तेंडुलकरने दिला सल्ला, पाहा VIDEO
यावेळी मलायकाने तिच्या आणि अर्जुनच्या वयातील अंतराबद्दलही आपलं मत स्पष्ट केलं. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा वयातल्या अंतराचा फारसा फरक पडत नाही. ही दोन व्यक्तिंच्या मनातली भावना असते. पण आपण अशा समाजात राहतो जिथे वयाने मोठा मुलगा लहान मुलीला डेट केलं तर चालतं पण मोठ्या वयाच्या मुलीने वयाने कमी असलेल्या मुलाला डेट केलं तर समाजाला पटत नाही. मी अशा लोकांना फारशी भीक घालत नाही.
भारत- इंग्लंड सामन्यात ऋषी कपूर यांनी केले मजेशीर ट्वीट, पाकिस्तानी चाहते भडकले
सलमान खानने तहानलेल्या माकडाला पाजलं पाणी, VIDEO VIRAL
मलायकाने यावेळी अर्जुन आणि तिला मुलगा अरहानच्या नात्याबद्दलही सांगितलं. अरहानशी तिने या नात्याबद्दल मोकळेपणाने चर्चा केली असून तो या नात्याबद्दल खूश असल्याचं मलायका म्हणाली. याआधी मलायकाने अर्जुनच्या वाढदिवसाला दोघांचा रोमँटिक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा