मुंबई, 26 जानेवारी : अभिनेता शाहरुख खान चा पठाण सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. शाहरुखसह अभिनेत्री दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमातून शाहरुख तब्बल 4 वर्षांनी कमबॅक करतोय. सिनेमा प्रदर्शित होताच सिनेमाचं थिएटरमध्ये एकच हल्लाबोल केला. सिनेमा शुक्रवारी रिलीज न होता बुधवारी रिलीज झाला असला तरी प्रेक्षकांनी सिनेमा प्रचंड प्रतिसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सिनेमा 4.19 लाखांच्या अँडवान्स बुकींगसह रिलीज झाला. शाहरुखच्या चाहत्यांनी अनेक ठिकाणी संपूर्ण थिएटर बुक केलं होतं. दरम्यान पठाण पहिल्या दिवशी 45-50 कोटींची ओपनिंग कमाई करेल अशी शक्यता सिनेमा क्रिटिक्सकडून वर्तवण्यात आली होती. मात्र पठाणनं पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली आहे. त्याचप्रमाणे अनेक राज्यांमध्ये थिएटर्स रिकामी असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. पठाणचा जलवा फक्त एका दिवसासाठी होता का? असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. सोशल मीडियावर अनेक जण पठाण विषयी आपली मत मांडत आहेत. ट्विटरवर ‘फ्लॉप हुई पठाण’ असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. ‘शाहरुखनं सोशल मीडियावर कितीही पैसा खर्च केला तरी थिएटरमध्ये कोणीही येणार नाही’, असे ट्विट अनेकांनी केले आहेत. रिकाम्या थिएटरमधील फोटो देखील आता समोर आले आहेत. हेही वाचा - ‘नाहीतर आम्ही मल्टिप्लेक्सचेच ‘बांबू’ लावू’; पठाण रिलीज होताच मनसेचा इशारा
फिल्म क्रिटिक तरण आर्दश यांनं पठाण पहिल्या दिवशी 45-50 कोटींची कमाई करेल अशी शक्यता वर्तवली होती मात्र सिनेमानं पहिल्या दिवशी शक्यतेपेक्षा अर्धी कमाई केली आहे. ऐकूण 25.05 कोटींची कमाई केली. ज्यात PVR 11.40 कोटी, INOX 8.75, CINEPOLIS 4.90 कोटी इतकी कमाई आहे.
पठाणचे शो सकाळी 6 वाजल्यापासून मध्यरात्री पर्यंत लावण्यात आले आहेत. नवी दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ मधील अनेक थिएटर्समध्ये पठाण सिनेमाचे थिएटर्स रिकामी असल्याचं पाहायला मिळत आहे. थिएटर्सच्या तिकिट काऊंटर रिकामी असून सिनेमासाठी तुरळक गर्दी पाहायला मिळत आहे.
बकवास फ़िल्म 😂😂#फ्लॉप_हुई_पठानhttps://t.co/PwtCHVVYJmpic.twitter.com/66y6G7kWbO
— Harish Sharma (@Sharmaharishji) January 26, 2023
सिनेमा फक्त शाहरुखसाठी पाहायला आलोय अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात पठाण पाहून आलेली एक महिला सांगते, ‘बकवास होता पठाण. काहीच नाहीये त्यात’. हा व्हिडीओ ट्विटवर व्हायरल झाला आहे.
त्याचप्रमाणे सिनेमातील अनेक सीन्स व्हायरल झाले असून सिनेमाला काहीच लॉजिक नसल्याचं म्हटलं जात आहे. एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात सलमान खान आणि शाहरुखचा सीन दाखवण्यात आलाय. युझरनं लिहिलीय, ‘ट्रेनच्या उलट्या दिशेला धावून देखील दोघांचा स्पीड ट्रेनपेक्षा जास्त आहे. सिनेमा हिट करायचा आहे फक्त. लॉजिकशी काही घेणं देणं नाहीये. वाईट सिनेमा’.

)







