मुंबई, 25 जानेवारी : अभिनेता शाहरुख खान चा बहुचर्चित पठाण सिनेमा आज अखेर रिलीज झाला आहे. 4.19 लाखांचं अँडवान्स बुकींसह मुंबईसह देशातील थिएटर्स हाऊसफुल्ल झालेत. शाहरुखच्या चाहत्यांनी पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी केली आहे. मुंबईसह पुण्यातील थिएटर्सच्या बाहेर पोलिसांच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पठाण पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी कोणताही धुडगूस घालू नये, त्याचप्रमाणे अनेक हिंदू संघटनांनी सिनेमाला विरोध केला होता. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. मंबईच्या पीवीआर ओबेरॉय थिएटरमध्ये 6-7 पोलीस अधिकारी असून 60 टक्के ऑक्यूपेसीबरोबर पठाणचा पहिला शो सुरू झाला आहे. पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो सुरू होताच थिएटरमध्ये शाहरुखच्या चाहत्यांचा मोठा उत्साह सुरू आहे. प्रेक्षक शाहरुखला चिअर अप करताना दिसले. मुंबईत अनेक थिएटर्समध्ये सकाळी 6 आणि 7 वाजताचे शो सुरू करण्यात आलेत. सकाळचे दोन्ही शो हाऊसफुल्ल आहे. हेही वाचा - हनिमूनला जाऊ की पठाण बघायला? कन्फ्युज झालेल्या फॅनला शाहरुखनं दिला भन्नाट सल्ला सिनेमात अभिनेत्री डिंपल कापाडिया भारतीय सुरक्षा व्यवस्थेची अधिकारी दाखवण्यात आली आहे. जी पठाणबरोबर काम करते. एका सीसीटीव्ह सर्विलांसमधून दीपिकाची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. दुष्मनांशी लढून आलेला पठाण हेलिकॉप्टर उडवताना दिसत आहे. कुर्सी की पेटी बांध लीजिए क्योंकी मौसम बिघडने वाला है, म्हणत पठाणमध्ये शाहरुखची दमदार एंट्री दाखवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शाहरुख सिनेमात दुष्मनांना अरबी नाही तर हिंदींत बोल अशी धमकी देखील देताना दिसतोय. पठाण सिनेमानं रिलीजच्या आधीच 4.19 लाखांहून अधिक अँडवान्स बुकींग झालं आहे. पठाण सिनेमा 45-50 कोटींचं ओपनिंग कलेक्शन करेल अशी शक्यता सिनेअभ्यासकांकडून वर्तवण्यात आली आहे. पठाण हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषेत रिलीज झालाय. एकूण 5200 स्क्रिन, विदेशात 2500 स्क्रिन्ससह एकूण 7700 स्क्रिन्स वर्ल्ड वाईल्ड पठाण रिलीज झाला आहे. सिनेमातील बेशरम रंग गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणनं घातलेल्या भगव्या बिकीनीमुळे वाद निर्माण झाला होता. गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. सेन्सॉर बोर्डानं बेशरम रंग गाण्यावर आणि सिनेमातील अनेक सीन्सवर कात्री लावली होती. मात्र पठाण सिनेमात दीपिका बेशरम रंग गाण्यात स्विम सूटमध्येच दिसत आहे. शाहरुख खानबरोबर असलेला रोमँटिक सीन मात्र कट करण्यात आला आहे. ऑरेंज बिकीनीमध्ये दीपिका शाहरुख बरोबर रोमान्स करताना दिसत नाहीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.