मलायका-अर्जुनमध्ये आता प्रेमाचा त्रिकोण, दोघांत आली तिसरी व्यक्ती

नुकतंच परिणीतीने ट्विटरवर तिच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या. या प्रश्नोत्तरांच्या फेरीत तिने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2019 08:40 AM IST

मलायका-अर्जुनमध्ये आता प्रेमाचा त्रिकोण, दोघांत आली तिसरी व्यक्ती

मुंबई, 08 जुलै- परिणीती चोप्रा सध्या तिच्या आगामी सायना नेहवालच्या बायोपिकची तयारी करत आहे. यासोबतच तिच्या जबरिया जोडी सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. वेगळ्या विषयाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे अनेकांना हा ट्रेलर आवडलाही. नुकतंच परिणीतीने ट्विटरवर तिच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या. या प्रश्नोत्तरांच्या फेरीत तिने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी परिणीतीच्या चाहत्यांने तिला प्रश्न विचारला की, ‘तुझं अर्जुन कपूरवर किती प्रेम आहे?’ या प्रश्नाचं उत्तर देताना परिणीती म्हणाली की, तिचा सिनेसृष्टीतील सर्वात पहिला मित्र अर्जुन कपूर होता. अर्जुन आणि परिणीती फार चांगले मित्र असून एकत्र असल्यावर ते खूप धमाल मस्ती करत असतात.

परिणीतीने पूर्ण केलं बॉटल कॅप चॅलेंज-

सध्या बॉलिवूडमध्ये #Bottlecapchallenge क्रेझ आहे. अभिनेता अक्षय कुमार पाठोपाठ सिद्धार्थ मल्होत्रा आणि टायगर श्रॉफ, विद्युत जामवाल अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनी हे चॅलेंज पूर्ण केलं. हॉलिवूड नंतर आता बॉलिवूडमध्ये या चॅलेंजची क्रेझ वाढत आहे. पण सध्या बॉलिवूडमध्ये असा एक वर्ग आहे ज्यांनी विनोदी स्टाइलमध्ये हे चॅलेज पूर्ण केलं. मराठीतील स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर. बॉलिवूडमधील सुनील ग्रोवर, कुणाल खेमू यांनी त्यांच्या हटके स्टाइलमध्ये हे चॅलेंज पूर्ण केलं. ज्यात आता अभिनेत्री परिणिती चोप्राचा समावेश झाला आहे.

परिणीती चोप्रानं काही दिवसांपूर्वीच तिचा आगामी सिनेमा ‘जबरिया जोडी’चं शूटिंग पूर्ण केलं असून सध्या ती भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकचा तयारी करत आहे. बॉलिवूडमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं #Bottlecapchallenge परिणीतीनं सुद्धा पूर्ण केलं असून तिनं याचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला.

Loading...

 

View this post on Instagram

 

Sidoooo this is my version! @sidmalhotra #BottleCapChallenge #KHADKEGLASSY OUT NOW!

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

बॉलिवूडमध्ये सर्वात अगोदर अक्षय कुमारनं हे #Bottlecapchallenge पूर्ण केलं. त्यानंतर टायगर श्रॉफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा, विद्युत जामवाल या बॉलिवूड कलाकारांनी या चॅलेंजचे व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले. 2018 मध्ये आलेल्या किकी चॅलेंज नंतर आता आलेल्या या बॉटलकॅप चॅलेंजनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चॅलेंजमध्ये पायाच्या सहाय्यानं बॉटलचं झाकण काढायचं असतं. यामध्ये योग्य समतोल आणि फिटनेस खूप महत्त्वाचा असतो.

...म्हणून सपना चौधरीने विष घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न

या 4 सेलिब्रिटींनी कपिल शर्मा शोमध्ये जाण्यास दिला स्पष्ट नकार

VIDEO- विराटच्या चौकारावर अनुष्काने विचारले, ‘फोर का सिग्नल क्या होता है...’

सामन्या दरम्यान पंजाबी गाण्यावर थिरकली अनुष्का शर्मा, पाहा VIDEO

EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 08:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...