मुंबई, 04 मे : अभिनेत्री परिणीती चोप्रा नं नुकतीच तिच्या राघव चड्ढा चं नात्याविषयी खुलासा केला. अभिनेत्री परिणीती आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांना एकत्र आयपीएल मॅचच्या स्टेडियमवर स्पॉट करण्यात आलं. नुकत्याच झालेल्या मुंबई इंडियन्स आणि पंजाब किग्सची मॅच पाहण्यासाठी दोघे स्टेडियमवर पोहोचले होते. दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांची जोडी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. दोघांचा रोमँटिक मुड कॅमेरात कैद करण्यात आलाय. दोघांना स्टेडियमवर एकत्र पाहताच चाहत्यांनी ‘परिणीती भाभी’ म्हणत एकच जल्लोष सुरू केला. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी स्डेडियमवर एंट्री घेताच उपस्थित चाहत्यांनी परिणीती भाभी जिंदाबाद अशा घोषणा द्यायला सुरूवात केली. एकीकडे मुंबई इंडियन आणि पंजाब किग्सची रोमंचक मॅचकडे सर्वांचं लक्ष होतं तर स्टेडियम पोहोचलेल्या या कपलनं देखील सगळ्यांचा नजरा रोखून धरल्या. दरम्यान परिणीतीला चाहते भाभी बोलताच ती खुदकन लाजली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय. हेही वाचा - साऊथचे टॉप 5 क्राइम थ्रिलर चित्रपट, सस्पेंन्स चक्रावून टाकणारा; विचार करून येईल डोकं फुटण्याची वेळ इतकंच नाही तर आयपीएल पाहण्यासाठी आलेल्या कपलनं कपड्यांच्या बाबतीत ट्युनिंग केलेलं पाहायला मिळालं. दोघांचा रोमँटिक अंदाज आणि हसणारे चेहरे पाहून चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. दोघांचा स्टेडियममधील व्हिडीओ सध्या चर्चा विषय बनला आहे. दोघांकडे कॅमेरा येताच दोघेही ब्लश करताना दिसत आहेत.
राघव आणि परिणीतीच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. पण दोघांनी अजून नात्यावर खुलेपणानं भाष्य केलेलं नाही. 13 मे रोजी दोघांचा साखरपुडा होणार असल्याचं सांगण्यात येतंय पण दोघांच्या कुटुंबाकडून याबाबत कोणती माहिती समोर आलेली नाही. दरम्यान ईडीनं नुकत्याच सादर केलेल्या आरोप पत्रामध्ये आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढाचं नाव आलं. त्यामुळे आता दोघांचा ठरलेल्या दिवशी होणार की पुढे ढकलला जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
परिणीतीनं मध्यंतरी एका मुलाखतीत कोणत्याही राजकीय नेत्याशी लग्न करणार नाही असं म्हंटलं होतं. त्यानंतर आता राजकीय नेत्याच्या प्रेमात परिणीती कशी पडली? त्यांची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे.