जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Parineeti Chopra: परिणितीच्या होणाऱ्या नवऱ्याचं ईडीच्या आरोपपत्रात नाव; पुढे ढकलणार का अभिनेत्रीचा साखरपुडा?

Parineeti Chopra: परिणितीच्या होणाऱ्या नवऱ्याचं ईडीच्या आरोपपत्रात नाव; पुढे ढकलणार का अभिनेत्रीचा साखरपुडा?

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा

परिणिती आणि आपचे खासदार राघव चड्ढा लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा होत आहे. पण आता या दोघांच्या नात्याविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 मे : बॉलिवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रा  दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. परिणीती लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. प्रियांकाची बहीण परिणीती कोणत्या अभिनेत्याच्या नाही तर चक्क राजकीय नेत्याच्या प्रेमात पडली आहे असं बोलला जातंय. परिणीती आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा होत आहे. हे दोघे अनेकदा एकत्र स्पॉट होतात. एवढंच नाही तर राघवचं नाव घेताच कॅमेऱ्यासमोरच परिणीती लाजते. त्यामुळे या दोघात नक्कीच काहीतरी चाललं असल्याचं सगळेच म्हणतायत. पण त्यावर या दोघांनी अजूनही मौन बाळगलं आहे. पण आता या दोघांच्या नात्याविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. परिणिती आणि आपचे खासदार राघव चड्ढा अनेकदा  डिनर आणि लंचसाठी एकत्र जाताना स्पॉट होतात. एवढंच नाही तर अनेकदा एअरपोर्टवर देखील दोघांना सोबत पाहिलं गेलंय. त्यामुळेच यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा दिवसेंदिवस रंगातच आहे.  हे दोघेही शिक्षणासाठी लंडनमध्ये एकत्र होते, तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. मात्र अद्याप दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपविषयी भाष्य केलेले नाही. मात्र मीडिया रिपोर्टनुसार या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याचे समोर आले आहे. आता हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत पण त्यापूर्वी एक अपडेट समोर आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

परिणीती सोबत लग्न करण्यापूर्वी  ईडीच्या आरोपपत्रात आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांचे नाव आले आहे. मात्र, आरोपपत्रात आरोपी म्हणून त्याचे नाव नाही असा  ईडीने नुकताच उल्लेख केला. त्यामुळेच त्यांचा साखरपुडा आता ठरलेल्या वेळेतच होणार कि पुढे ढकलला जाणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Jay Jay Swami Samarth: जय जय स्वामी समर्थ मालिकेतील कलाकारांची अक्कलकोट वारी; रील स्वामींना पाहून चाहत्यांना सुखद धक्का परिणीती आणि राघव यांचा रोका हा कार्यक्रम मागच्या महिन्यात झाला असून आता लवकरच १३ मे रोजी दोघेही साखरपुडा करणार असल्याचं बोललं जातंय. परिणीती आणि राघव दोघेही 34 वर्षांचे असून त्यांनी ब्रिटनमध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे. आता त्यांच्या लग्नासाठी दोघांचेही चाहते चांगलेच आतुर झाले आहेत.. परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या नात्याच्या अफवा तेव्हा सुरू झाल्या जेव्हा दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाले. यानंतर अभिनेत्री सतत दिल्लीचा दौरा करत होती. दोघेही अनेकदा विमानतळावर स्पॉट झाले होते. एकदा तर दोघांनी एकमेकांचे हातात हात घेतलेला देखील दिसला. पण त्यांच्या नात्याबद्दल दोघेही  कधीच उघडपणे बोलले नाहीत. राघव आणि परिणीती यांच्या नात्याचे प्रकरण राज्यसभेतही पोहोचले होते. इकडे राघव जेव्हा सदनातून बाहेर पडत होता, तेव्हा मीडियाने त्याला अभिनेत्रीबद्दल प्रश्न केला, तेव्हा तो म्हणाला,  लवकरच तुम्हाला उत्तर देईन. त्याच वेळी, जेव्हा पापाराझीने परिणीतीला विचारले की तुझे लग्न कधी होणार आहे, तेव्हा ती गालातल्या गालात लाजत तिथून निघून गेली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात