आता अनेक साऊथ सिनेमांचे म्हणजेच तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेतील सिनेमे हिंदी भाषेत सहज उपलब्ध होतात. यातील काही सिनेमे तुम्हाला युट्यूबवर देखील पाहायला मिळतील.
एका लावारिस मृतदेहावर आधारित पुरूषा प्रेषम हा सिनेमा आहे. सोनी लिव हा सिनेमा पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
पोलीस गुन्हेगाराचा शोध कसा घेतात हे या सिनेमात पाहायला मिळतं. IMBDवर सिनेमाला 6.5 रेटींग आहे. यूट्यूबवर हिंदी भाषेतही हा सिनेमा उपलब्ध आहे.
बकासुरण हा सिनेमा 2023मध्ये रिलीज झाला आहे. मुळ तमिळ भाषेत असलेला हा सिनेमा युट्यूबवर उपलब्ध आहे. IMDB वर सिनेमा 6.3 रेटींग मिळालं आहे.
किन्नरसनी हा सिनेमा मागील वर्षी रिलीज झाला आहे. झी 5वर हा सिनेमा पाहता येईल. सिनेमाला IMDB वर 7.2 रेटींग मिळाली आहे.