जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Parineeti Chopra Wedding: परिणीती आणि राघव चढ्ढांच्या लग्नाबाबत मोठी अपडेट! 'या' ठिकाणी सुरु झालीये साखरपुड्याची तयारी

Parineeti Chopra Wedding: परिणीती आणि राघव चढ्ढांच्या लग्नाबाबत मोठी अपडेट! 'या' ठिकाणी सुरु झालीये साखरपुड्याची तयारी

राघव चढ्ढा आणि  परिणीती चोप्रा

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा या दोघांनी अजूनही मौन बाळगलं असलं तरी अनेक जणांनी दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. आता या दोघांच्या लग्नाविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 04 एप्रिल: सध्या बॉलिवूडच्या एका रूम्ड कपलच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रियांका चोप्राची बहीण आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती एका राजकीय नेत्याच्या प्रेमात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. परिणीती आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्यात नेमकं काय चाललंय, याची देशभर चर्चा होत आहे. हे दोघे अनेकदा एकत्र स्पॉट होतात. त्यामुळेच हे दोघे  रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा बी टाऊन मध्ये रंगली आहे. पण त्यावर या दोघांनी अजूनही मौन बाळगलं असलं तरी अनेक जणांनी दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. आता या दोघांच्या लग्नाविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. राघव चढ्ढा आणि  परिणीती चोप्रा आता या नात्याला अधिकृत करणार आहेत. दोघेही लवकरच एंगेजमेंट करणार असल्याची माहिती समोर आली आहे. जेव्हापासून पापाराझींनी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना एकत्र पाहिले तेव्हापासून या दोघांच्याही चर्चा रंगल्या आहेत. पहिल्यांदा एकत्र डिनरवर, नंतर लंचवर आणि त्यानंतर या भेटीच्या काही दिवसांतच अभिनेत्री फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी गेली. तेव्हापासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत आणि लग्न करण्याचा विचार करत असल्याच्या अफवा आहेत. या महिन्यात दोघेही एंगेजमेंट करणार असल्याचे बोलले जात असून या खास सोहळ्यासाठी अभिनेत्री नुकतीच दिल्लीला पोहोचली आहे. Parineeti Chopra Wedding: अवघ्या 6 महिन्यांपूर्वीच परिणीतीचं राघव चड्ढांवर जडलं प्रेम; कुठे झाली दोघांची पहिली भेट? हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, परिणीती आणि राघव एप्रिलमध्येच एंगेजमेंट करणार आहेत. हा एंगेजमेंट सोहळा अतिशय खाजगी असणार आहे. सुरुवातीपासूनच, या जोडप्याने त्यांचे नाते खाजगी ठेवले आहे आणि आतापर्यंत दोघांनी अजूनही मौन बाळगलं आहे.

जाहिरात

दोघांचा एंगेजमेंट सोहळा अतिशय खाजगी असणार आहे, ज्यामध्ये फक्त दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि त्यांचे काही जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. नुकतीच परिणीतीची बहीण प्रियांकाही तिच्या कुटुंबासह भारतात आली असल्याने यावेळी एंगेजमेंट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

News18लोकमत
News18लोकमत

राजकीय नेत्याच्या प्रेमात परिणीती पडली आहे. पण त्यांची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे. मध्यंतरी अभिनेत्रीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात परिणितीने कोणत्याही राजकीय नेत्याशी लग्न करणार नाही असं म्हंटलं होतं. परिणीती सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘जबरिया जोडी’ चित्रपटाचे प्रमोशन करत होती, तेव्हा तिला विचारण्यात आले की तिला कोणत्या सेलिब्रिटी क्रीडापटू, चित्रपट अभिनेता, उद्योगपती किंवा राजकारणीसोबत लग्न करायचे आहे. राजकारण्याचे नाव घेताच ती म्हणाली, ‘इतरही अनेक चांगले पर्याय आहेत, पण तिला कोणत्याही राजकारणातील नेत्याशी लग्न करायला आवडणार नाही’. आता परिणितीचा हा जुना व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात