मुंबई, 22 जानेवारी: झी मराठीवरील ‘ माझी तुझी रेशीमगाठ ’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री सगळ्यांनाच आवडली. पण छोट्याशा परीला मात्र प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या मालिकेतून श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे सोबतच मायरा वैकुळ देखील घराघरात पोहचली. मालिका सतत टीआरपीच्या शर्यतीत टॉप 10 मध्ये दिसून यायची. मात्र आता मालिका आपल्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. आता यश आणि नेहाला निरोप देताना प्रेक्षक तर भावुक झालेत पण श्रेयसच्या एका पोस्टने मात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. नुकतीच श्रेयसने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने मालिकेच्या शेवटच्या दिवसाच्या शुटिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो प्रार्थना ते परी सगळ्यांची भेट घेताना दिसत आहे. पण या व्हिडिओला त्याने दिलेल्या कॅप्शनमधून मोठा खुलासा होत आहे. हेही वाचा - Madhurani Prabhulkar: अरुंधती आणि अनुष्काने सोबत मिळून केलं असं काही! दोघींच्या ‘त्या’ व्हिडिओची होतेय चर्चा हा व्हिडीओ शेअर करताना श्रेयस म्हणतोय कि, शो संपतोय….आपलं नात नाही….आपली ही रेशीमगाठ अशीच कायम राहणार आहे…वर्षानुवर्ष…कारण आम्ही लवकरच काहीतरी नवीन घेवुन येऊ….फक्त तुमच्यासाठी….आणि म्हणूनच कोणीतरी म्हंटलय….*Picture* अभी बाकी है मेरे दोस्त….कुछ समझे??’’ श्रेयसने लिहिलेल्या या कॅप्शनमुळे मालिकेचा दुसरा सिझन लवकरच येणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
या पोस्टखाली चाहत्यांनी देखील कमेंट्स केल्या आहेत. ‘पण तुमची मालिका संपायला नको होती’, ‘खूप खूप मिस करू तुम्हाला’, ‘कायम लक्षात राहिल अशी मालीका नक्कीच बघणार’ अशा इमोशनल कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. मालिका बंद होत असल्याने या मालिकेचे प्रेक्षक आणि कलाकारांचे चाहते नाराज आहेत. पण आता श्रेयसने केलेल्या या पोस्टमुळे त्यांच्यात नवीन आशा निर्माण झाली आहे. मालिका बंद केली जाऊ नये यासाठी अनेकजण कमेंट्स करत मालिका सुरु ठेवण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे मागच्या सारखं पुन्हा ब्रेक घेऊन मालिका नव्यानं भेटीला येणार का ते बघणं महत्वाचं आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा शेवटचा एपिसोड येत्या रविवारी म्हणजेच २२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. तर मालिकेचं शूट देखील नुकतंच संपलं आहे. मालिकेत यशवर्धन चौधरी ही भूमिका अभिनेता श्रेयस तळपदेने साकारली होती. मालिकेच्या शेवटच्या भागानिमित्त श्रेयसचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये त्याने प्रेक्षकांचे आभार मानले होते. दरम्यान ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून श्रेयस आणि प्रार्थना बेहेरेने अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं. यश आणि नेहाची फ्रेश जोडी प्रेक्षकांना फारच आवडली होती. तर आपल्या गोड अभिनयाने आणि बोलक्या स्वभावाने परीने सर्वांचं मन जिंकलं होतं. या तिघांना प्रेक्षक भरभरुन प्रेम देत होते. मात्र आता मालिका निरोप घेत आहे.