अभिनेता श्रेयस तळपदेने बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे त्याचसोबत तो सध्या मराठी टेलिव्हिजन देखील गाजवत आहे. श्रेयस तळपदे जितका त्याच्या प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत आहे तितकं तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसत नाही.
श्रेयसने अठरा वर्षांपूर्वी याच दिवशी आपली बायको दीप्तीसोबत लग्नगाठ बांधली होती. आज हे दोघे सुखी संसार करत आहेत.
श्रेयस आणि दीप्तीच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगायचे तर श्रेयस आणि दीप्ती यांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली होती.
'आभाळमाया' या मालिकेमुळे श्रेयसला ओळख मिळाली होती. त्यामुळे त्याला विनायक गणेश महाविद्यालयातील स्नेहसंमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आले. अतिथी म्हणून बोलावण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती.
त्या वेळी त्या कॉलेजची सिक्रेटरी म्हणून दीप्ती देशमुख काम पाहत होती. दीप्तीने फोनवरून श्रेयसला निमंत्रण दिले. त्यानंतर 2-3 वेळा फोनवर बोलणे झाले.
21 डिसेंबरच्या कार्यक्रमाआधी दीप्ती मैत्रिणींसह श्रेयसला प्रत्यक्ष निमंत्रण देण्यासाठी गेल्या. श्रेयसने दीप्तीला पाहिले. दीप्तीने श्रेयसला पाहिले आणि हे दोघेही पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले.
त्यानंतर दोघे अनेकदा भेटू लागले, बोलू लागले आणि त्यांचं प्रेम बहरत गेलं. त्यानंतर श्रेयसने दिप्तीला प्रपोज केलं.