• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • असं हे बॉलिवूड! ‘दिलीपकुमार यांचं सकाळी निधन अन् नीतू कपूर यांनी रात्री केली पार्टी’

असं हे बॉलिवूड! ‘दिलीपकुमार यांचं सकाळी निधन अन् नीतू कपूर यांनी रात्री केली पार्टी’

“सकाळी दिलीप कुमार यांचं निधन झालं अन् संध्याकाळी यांनी पार्टी केली”, असा उपरोधिक टोला त्यानं लगावला आहे.

 • Share this:
  मुंबई 10 जुलै: कमाल आर. खान (KRK) उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर तो रोखठोक मतप्रदर्शन करताना दिसतो. यावेळी त्याने दिलीप कुमार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवरून कपूर कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. (Legendary actor Dilip Kumar passes away) “सकाळी दिलीप कुमार यांचं निधन झालं अन् संध्याकाळी यांनी पार्टी केली”, असा उपरोधिक टोला त्यानं लगावला आहे. नेमकं काय म्हणाला केआरके? “सकाळी दिलीप कुमार यांचं निधन झालं. पाच वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिव शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि रात्री 9 वाजता बॉलिवूडवाल्यांनी नीतू कपूर यांचा वाढदिवस साजरा केला. नीतू कपूर यांनी वाढदिवस साजरा करणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही पण त्यांनी दिलीप कुमार यांचा थोडा तरी आदर ठेवायला हवा होता.” “म्हातारी तुझी आई असेल”; संतापलेल्या कविता कौशिकनं ट्रोलर्सची बोलती केली बंद  ‘हा स्प्रे मारला असता आमिरचा घटस्फोट झालाच नसता’; राखी सावंतचा अजब दावा “नीतू कपूर यांनी केलेली पार्टी हा पुरावा आहे की बॉलिवूड हे काही कुटुंब नाही. ही केवळ व्यवसाय करण्याची एक जागा आहे. इथे कोणीही तुमचा मित्र नाही. इथे केवळ जीवघेणी स्पर्धा आहे. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात यशस्वी आहात लोक तुम्हाला विचारता. अन् तुमचं यश संपलं की लोक तुम्हाला विसरतात.” अशा आशयाची दोन ट्विट्स करुन कमाल खाननं कपूर कुटुंबीयांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्याचे हे ट्विट्स सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. अनेकांनी तर त्याच्या या मतांना आपलं समर्थन देखील दिलं आहे. दरम्यान या पार्टी प्रकरणावर अद्याप कपूर कुटुंबातील कुठल्याही कलाकारानं अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
  Published by:Mandar Gurav
  First published: