Home /News /entertainment /

“म्हातारी तुझी आई असेल”; संतापलेल्या कविता कौशिकनं ट्रोलर्सची बोलती केली बंद 

“म्हातारी तुझी आई असेल”; संतापलेल्या कविता कौशिकनं ट्रोलर्सची बोलती केली बंद 

बिकिनी फोटोमुळे कविताला केलं जात होतं ट्रोल; अखेर संतापलेल्या अभिनेत्रीनं दिलं जोरदार प्रत्युत्तर

  मुंबई 10 जुलै: FIR या विनोदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली कविता कौशिक ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मालिकांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. हॉट आणि बोल्ड फोटोंद्वारे ती कायम चर्चेत असते. यावेळी देखील तिने असेच काही बोल्ड बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले. परंतु यामुळे काही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली. “तुझं आता वय झालं आहे” असं म्हणत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु कवितानं देखील “म्हतारी तुझी आई असेल” असं म्हणत त्याची बोलती बंद केली.
  ‘हा स्प्रे मारला असता आमिरचा घटस्फोट झालाच नसता’; राखी सावंतचा अजब दावा नेमकं काय म्हणाली कविता? कविताने काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये काही फोटो शेअर केले. आकाशात कोणीतरी आहे जो मला उडण्यासाठी पंख देतोय अशा आशयाची कमेंट तिनं या फोटोवर केली होती. मात्र ही कमेंट पाहून काही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली. 'बूढ़ी घोड़ी लाल लगाम' अशा प्रतिक्रिया देत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अखेर आपल्या रोखठोक प्रतिक्रियांसाठी प्रसिद्ध असलेल्या कवितानं देखील त्यावर प्रत्युत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केली. ‘सलमान खानला या प्रकरणातून दूर ठेवा’; Being Human कंपनीची पोलिसांना विनंती “भावा, मी कुठल्याही प्रकारचा लाल लगाम लावलेला नाही. अरे मी तर मेकअप सुद्धा केलेला नाही. केवळ थोडासा लिप बाम लावला आहे. आणि म्हातारे तर तुझे आई-वडिल देखील असतील. या देशात वय वाढणं पाप आहे का? आपल्या मुलांना तू हेच संस्कार देशील का? अन् तसं झालं तर चाळीशी नंतर तुझं आयुष्य जगणं हे व्यर्थच आहे.” अशा आशयाचं ट्विट करत कविताने तिला ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Entertainment, Photo video viral, Social media troll, Tv actress

  पुढील बातम्या