मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘हा स्प्रे मारला असता आमिरचा घटस्फोट झालाच नसता’; राखी सावंतचा अजब दावा

‘हा स्प्रे मारला असता आमिरचा घटस्फोट झालाच नसता’; राखी सावंतचा अजब दावा

जर त्यांनी या स्प्रेचा वापर केला असता तर आज त्यांच्यावर घटस्फोट घेण्याची वेळ आली नसती असं विचित्र विधान राखीनं केलं आहे.

जर त्यांनी या स्प्रेचा वापर केला असता तर आज त्यांच्यावर घटस्फोट घेण्याची वेळ आली नसती असं विचित्र विधान राखीनं केलं आहे.

जर त्यांनी या स्प्रेचा वापर केला असता तर आज त्यांच्यावर घटस्फोट घेण्याची वेळ आली नसती असं विचित्र विधान राखीनं केलं आहे.

मुंबई 10 जुलै: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या चित्रविचित्र आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा यामुळे तिला ट्रोल देखील केलं जातं. यावेळी तिनं आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटचं निमित्त साधून चक्क एका स्प्रे कंपनीची जाहिरात केली आहे. (Rakhi Sawant video viral) जर त्यांनी या स्प्रेचा वापर केला असता तर आज त्यांच्यावर घटस्फोट घेण्याची वेळ आली नसती असं विचित्र विधान राखीनं केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात परफेक्ट कपल म्हणून पाहिलं जात होतं. आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आमिरनं जवळपास 15 वर्ष किरणसोबत संसार केला. परंतु हा 15 वर्षांचा प्रवास अखेर थांबला. कारण त्यांनी घटस्फोट घेतला आहे. (Aamir Khan Kiran Rao divorce) आमिर आणि किरण यांनी एक जॉइंट स्टेटमेंट जारी करत ही धक्कादायक माहिती आपल्या चाहत्यांना दिली. त्यांच्या घटस्फोटावर विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत. मात्र यामध्ये राखीनं केलेली कमेंट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

‘सलमान खानला या प्रकरणातून दूर ठेवा’; Being Human कंपनीची पोलिसांना विनंती

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

ही ‘Choti Kangana’ आहे तरी कोण? Photo पाहून बॉलिवूडची क्वीनही चक्रावली

“मला पर्फ्युम, कपडे, साबण, ज्वेलरी अशा वस्तूची जाहिरात मिळावी अशी इच्छा होती. परंतु माझ्या नशिबात हा स्प्रे आहे. या स्प्रेचा वापर केल्यास तुमचा घटस्फोट कधी होणार नाही. हा स्प्रे मी आमिर खानला दिला पाहिजे होता. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला नसता.” अशी वक्तव्य या व्हिडीओमध्ये राखी सावंत करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Aamir khan, Rakhi sawant, Video viral