मुंबई, 19 डिसेंबर- बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्यासाठी डिसेंबर महिना खूप खास आहे. या महिन्यात दोघांचे लग्न झाले आणि आता दोघांनीही आयुष्याचा नवा प्रवास सुरू केला आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. लग्नानंतर कतरिना कैफ आणि विकी कौशल कामावर परतणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
कतरिना कैफ लग्नानंतर अभिनेता सलमान खानला (salman khan) कधी भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री पुढच्या महिन्यात या सलमानला भेटणार आहे. ती तिच्या टायगर 3 चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात करणार आहे. पिंकविला या इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, सलमान खान आणि कतरिना कैफ पुढील महिन्यात त्यांच्या टायगर 3 चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहेत.
वाचा-NCP नेते Praful Patel यांच्या मुलाच्या लग्नात सलमान खानचा जबरदस्त डान्स, VIDEO
चित्रपटाचे हे शेवटचे शेड्यूल असेल जे 15 दिवस चालणार आहे. टायगर 3 चे शेवटचे शेड्यूल दिल्लीत शूट होणार आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या शूटिंग सेटवर कडक सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. चित्रपटाचा कोणताही सीन लीक होऊ नये यासाठी ही सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे टायगर 3 चे शेवटचे शेड्यूल अॅक्शनने भरलेले असणार आहे. यापूर्वी या चित्रपटाचे शूटिंग रशिया, तुर्की, ऑस्ट्रिया आणि मुंबईत झाले आहे.
View this post on Instagram
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये 9 डिसेंबर रोजी झाला. त्यांचे लग्न अत्यंत शाही होते. विकी आणि कतरिनाने त्यांच्या लग्नाची तारीख अतिशय खाजगी ठेवली होती. तसेच लग्नात आलेल्या पाहुण्यांना आणि मित्रमंडळींना लग्नाच्या कोणत्याही फंक्शनचे फोटो काढण्याची परवानगी नव्हती. पण लग्नानंतर दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया हँडलवर लग्नाच्या फंक्शन्सचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना त्यांच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे.
वाचा-Video- सलमान खानला घाबरली सनी लिओनी; म्हणाली, 'थप्पड मत मारो..'
मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांनुसार, 20 डिसेंबरला कतरिना कैफ आणि विकी कौशल मुंबईत ग्रॅंड रिसेप्शन देणार आहेत. या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी, कतरिना कैफ तिच्या रिसेप्शनसाठीही सब्यसाचीने डिझाइन केलेला पोशाख परिधान करणार असल्याचे वृत्त आहे. लग्नातही कतरिना आणि विकीने सब्यसाचीचे डिझायनर पोशाख कॅरी केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Salman khan, Vicky kaushal