मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

माजी केंद्रीय मंत्री Praful Patel यांच्या मुलाच्या लग्नात सलमान खानचा जबरदस्त जलवा! VIDEO झाला VIRAL

माजी केंद्रीय मंत्री Praful Patel यांच्या मुलाच्या लग्नात सलमान खानचा जबरदस्त जलवा! VIDEO झाला VIRAL

सलमान खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सलमान खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सलमान खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 19 डिसेंबर-  बॉलीवूडचा  (Bollywood)  'दबंग' सलमान खान   (Salman Khan)  कुठेही गेला की तिथलं वातावरण एखाद्या उत्सवासारखं होतं. सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळतात. असाच काहीसा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे  (NCP)  नेते, राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल  (NCP Leader Praful Patel)  यांचा मुलगा प्रजय पटेल यांच्या लग्न समारंभात झालं. या लग्नात इतर कलाकरांप्रमाणे सलमान खानदेखील पाहुणा म्हणून उपस्थित होता. मात्र स्टेजवर सलमान डान्स करू लागताच सर्वांचं लक्ष फक्त त्याच्यावरच लागलं होतं. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या 'जुम्मे की रात' गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

हा धमाकेदार व्हिडिओ सलमान खानच्या एका फॅन पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता, की सलमान खान स्टेजच्या दिशेने पाऊल टाकताच, लग्नात उपस्थित असलेले सर्व पाहुणे त्याला सलमान, सलमान….म्हणत चिअरअप करू लागतात. यासोबतच सर्व लोक त्याचे फोटोही काढू लागतात. तो स्टेजवर पोहोचताच त्याच्या 'किक' चित्रपटातील 'जुम्मे की रात' हे गाणं वाजू लागतं. त्यांनतर सलमान या गाण्याच्या हुक स्टेप्स करतो. सलमानला अशा धमाल पद्धतीने नाचताना पाहून लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो.

या लग्न समारंभामध्ये सलमान खान व्यतिरिक्त अनिल कपूर आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीहीनेसुद्धा हजेरी लावली होती. हा कार्यक्रम जयपूरमध्ये पार पडला. दरम्यान, जयपूर एयरपोर्टवर व्यवस्थापनाने विमानांच्या वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था केली होती. तसेच एयरपोर्टवरील सुरक्षा व्यवस्था चोख होती.पाहुण्यांच्या मुक्कामासाठी कुक्ससह अन्य तीन ते चार प्रसिद्ध हॉटेल्ही बुक करण्यात आली आहेत.

(हे वाचा:VIDEO: कतरिना-विकीनं नव्या घरात केला गृहप्रवेश! बनले अनुष्का-विराटचे शेजारी )

तसंच सलमान खानच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या महिन्यात त्याचा 'अंतिम' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अपेक्षेइतकी कमाई केली नाही. मात्र या चित्रपटातील त्याचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. या चित्रपटात पहिल्यांदाच त्याचा मेहुणा आयुष शर्माने एकत्र काम केलं आहे'. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचंसुद्धा विशेष कौतूक होत आहे. त्याच्या करिअरला या चित्रपटाने एक नवं वळण दिलं आहे. तसेच छोट्या पडद्यावरील अभिनेत्री महिमा मखवाणाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. आता सलमान कतरिना कैफसोबत 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे.

First published:

Tags: Entertainment, NCP, Salman khan