मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आलिया बिपाशानंतर विक्की-कतरिनाच्या घरी हलणार पाळणा? बेबी बंपसह करतेय शुटींग, फोटो व्हायरल

आलिया बिपाशानंतर विक्की-कतरिनाच्या घरी हलणार पाळणा? बेबी बंपसह करतेय शुटींग, फोटो व्हायरल

कतरिना कैफ

कतरिना कैफ

काही दिवसात विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. दरम्यान कतरिना प्रेग्नंट असल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. कतरिनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 14 नोव्हेंबर: काही महिन्यांआधी बॉलिवूडमध्ये लग्नसराईनं जोर धरला होता. एकापाठोपाठ एक कलाकारांची लग्न सुरू होती. त्यानंतर आता बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांच्या घरी बाळाचं आगमन झालं. नुकतीच अभिनेत्री आलिया भट्ट आई झाली. रणबीर आलियाच्या घरी चिमुकलीचा जन्म झाला. त्यानंतर अभिनेत्री बिपाशा बासू हिनं मुलाला जन्म दिला. त्यानंतर आता अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. दरम्यान मधल्या काळात कतरिना प्रेग्नंट असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र आता समोर आलेल्या एका फोटोवरून कतरिना प्रेग्नंट असल्यावर शिक्का मोर्तब झाल्याचं म्हणावं लागेल. एका वॅनिटीमधून बाहेर पडतानाचा कतरिनाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिचा बेबी बंप दिसत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, विक्की आणि कतरिना यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचा विचार केला आहे. नुकताच कतरिनाचा फोन भूत हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर तिनं विजय सेतुपतीबरोबर तिच्या पुढच्या सिनेमाच्या शुटींगला सुरूवात केली आहे. मेरी क्रिसमस या सिनेमाचं सध्या कतरिना शुटींग करत आहे.  याच सिनेमाच्या शुटींग दरम्यान कतरिनाचा एक फोटो समोर आला आहे ज्यात ती दरवाज्याला धरून हळूहळू उतरताना दिसत आहे. तसंच तिचा बेबी बंप देखील दिसत आहे.

हेही वाचा -  रणवीर-दीपिकाच्या संसाराला 4 वर्ष पूर्ण; त्यांची लव्हस्टोरी माहितीये का?

मिळालेल्या माहितीनुसरा, कतरिना तिच्या नव्या सिनेमात एका प्रेग्नंट महिलेची भूमिका साकारणार आहे.  कतरिनाचा पहिला साऊथ इंडियन सिनेमा असणार आहे.  या सिनेमात कतरिना मुख्य भूमिकेत आहे. अभिनेत्री साऊथ स्टार विजय सेतुपतीबरोबर दिसणार आहे. कतरिनाच्या नव्या सिनेमाचं शुटींग संपत आल्याची माहिती समोर येत आहे.

View this post on Instagram

A post shared by ETimes (@etimes)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला कतरिनाचा बेबी बंपबरोबरचा फोटो पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त खेला आहे. कतरिना बेबी बंपमध्ये फार छान दिसत आहे असं अनेकांनी म्हटलं आहे. विक्की आणि तिच्या आयुष्यात लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन व्हाव अशी इच्छा दोघांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

कतरिना आणि विक्की यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राजस्थानमध्ये शाही विवाह केला.काही दिवसात ते त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. दरम्यान मागच्या काही महिन्यांपासून कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे.  कतरिना आणि विक्की बाळाचं प्लानिंग करत असल्याचं देखील म्हटलं गेलं होतं. आता कतरिना खरंच प्रेग्नंट आहे का? हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतूर आहेत.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Katrina kaif, Vicky kaushal