जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / रणवीर-दीपिकाच्या संसाराला 4 वर्ष पूर्ण; त्यांची लव्हस्टोरी माहितीये का?

रणवीर-दीपिकाच्या संसाराला 4 वर्ष पूर्ण; त्यांची लव्हस्टोरी माहितीये का?

 रणवीर सिंह, दीपिका पादुकोण

रणवीर सिंह, दीपिका पादुकोण

बॉलिवूडच्या लोकप्रिय कपलपैकी सतत चर्चेत असणारं कपल म्हणजे अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण. दोघांचं लग्न झाल्यापासून दोघंही कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 नोव्हेंबर : बॉलिवूडच्या लोकप्रिय कपलपैकी सतत चर्चेत असणारं कपल म्हणजे अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण . दोघांचं लग्न झाल्यापासून दोघंही कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. या दोघांची जोडी पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही खूप इंटरेस्टिंग आहे. या दोघांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्तानं त्यांच्या लव्हस्टोरीविषयी जाणून घेऊया. रणवीर सिंहला दीपिका पदुकोण पहिल्या नजरेतच आवडली होती. रणवीरने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘2012 मध्ये मकाऊ येथे एका अवॉर्ड फंक्शनमध्ये जेव्हा त्याने दीपिकाला पाहिले तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता. या अवॉर्ड फंक्शनमध्ये दीपिका खूप सुंदर दिसत होती आणि तो तिच्यावरुन नजर हटवू शकत नव्हता’. या दोघांना जवळ आणण्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळीचा महत्त्वाचा वाटा आहे. ‘गोलियों की रासलीला: राम लीला’ या चित्रपटात भन्साळींनी रणवीर आणि दीपिकाला कास्ट केले. याच शूटिंगदरम्यान त्यांची लव्हस्टोरी खुलली. दोघंही एकमेकांच्या जवळ आले. हेही वाचा -  वरुण-नताशा लवकरच होणार आई-बाबा?; सलमान खानने दिली हिंट रणवीर आणि दीपिकाने एकमेकांना 6 वर्ष डेट केलं. दोघांनी एकमेकांनी व्यवस्थित समजून घेतल्यानंतर 2018 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. दीपिका-रणवीरने 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीतील लेक कोमो येथे कोकणी आणि सिंधी रितीरिवाजांनुसार लग्न केले. त्यांचं लग्न हा बॉलिवूडमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरला. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत होते. हे लग्न त्यांनी काही खास  आणि जवळच्या लोकांच्या उपस्थित केले. लग्नानंतर मुंबई आणि बंगळुरुमध्ये ग्रॅंड रिसेप्शन केलं.

जाहिरात

दरम्यान,बॉलिवूडचे पॉवर कपल म्हणून अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह ओळखले जातात. दोघेही कायमच कपल्स गोल्स देताना दिसतात. मात्र दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्यातील मतभेदाच्या बातम्यांनी मध्यंतरी जोर पकडला होता. दोघेही विभक्त होणार असल्याचं चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. या फक्त अफवाच होत्या.

News18लोकमत
News18लोकमत

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रणवीर सिंग ‘सर्कस’ या चित्रपटात पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिससोबत दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ‘सर्कस’ व्यतिरिक्त तो करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. दुसरीकडे, दीपिका पादुकोणचे अनेक मोठे चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. ती शाहरुख खानसोबत ‘पठाण’मध्ये स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय ती तिच्या पुढच्या प्रोजेक्टची शूटिंग करत आहे ज्यात प्रभास आणि अमिताभ बच्चन देखील आहेत. ‘द इंटर्न’च्या हिंदी रिमेकमध्येही दीपिका दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात