मेकअपशिवाय अशी दिसते कतरिना कैफ, फोटो झाला VIRAL

मेकअपशिवाय अशी दिसते कतरिना कैफ, फोटो झाला VIRAL

katrina kaif सध्या कतरिना भारत सिनेमाच्या यशाची चव चाखत आहे. सलमान खानचा हा सिनेमा ब्लॉकबस्टर कमाई करत आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जून- बॉलिवूड अभिनेत्री दिवस असो की रात्र त्यांना नेहमीच मेकअपमध्ये आणि स्टायलिश राहायला आवडतं. अशात जेव्हाही कोणती अभिनेत्री साध्या लुकमध्ये दिसते तेव्हा चाहते त्यांच्या त्या लुकचे फोटो पाहण्यासाठी फार उत्सुक असतात. सध्या कतरिना कैफसोबत असं होत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीची बार्बी डॉनला नुकतंच मुंबई एअरपोर्टवर पाहण्यात आलं. तिचा हा अंदाजही एवढा सुंदर दिसत होता की तिच्यावरून नजर हटत नव्हती. कतरिना फारच साध्या लुकमध्ये होती. ती इतकी सुंदर दिसत होती की तिला पाहून सगळ्यांच्या तोंडी सुंदर दिसावं तर कतरिनासारखंच असंच सारे म्हणत होते.

नऊवारी साडी नेसवत या अभिनेत्रीने साजरा केला जुळ्या मुलींचा पहिला वाढदिवस

VIDEO: अरबाज- सोहेलच्या मुलांमध्ये भांडण लावून सलमान झाला वेगळा

कतरिनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच ती रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. रिपोर्टनुसार यात ती अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. याआधी अक्षय आणि कतरिनाने तीस मार खां, दे दना दन, वेलकम यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांना नेहमीच आवडली असून त्यांचे अधिकतर सिनेमे हिट झाले आहेत. पुढच्यावर्षी २७ मार्चला सूर्यवंशी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

सध्या कतरिना भारत सिनेमाच्या यशाची चव चाखत आहे. सलमान खानचा हा सिनेमा ब्लॉकबस्टर कमाई करत आहे. आतापर्यंत या सिनेमाने २५० कोटींचा पल्ला गाठला आहे. भारत अली अब्बास आणि सलमानचा सलग तिसरा हिट सिनेमा आहे. याआधी दोघांनी टायगर जिंदा है, सुलतान या दोन सिनेमात एकत्र काम केलं होतं.

शाळेत मुलीची मस्करी केल्यामुळे भडकल्या स्मृती इराणी, दिलं जशास तसं उत्तर

VIDEO : बिचुकलेचं पितळ उघडं, आणखी एका गुन्ह्यात अडकला

First published: June 23, 2019, 3:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading