मुंबई, 23 जून- सुपरस्टार सलमान खान कधी नव्हे तो एवढा सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. महिन्यांतून एखाद दुसरी पोस्ट टाकणारा सलमान सध्या दर दिवशी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. त्याच्यात हा बदल नक्की कशामुळे झाला हेच जाणून घ्यायची सर्वांची इच्छा आहे. दरम्यान त्याने अजून तीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोहेल खानचा मुलगा योहानच्या व्हिडिओपासून सुरू झालेलं हे वेड आता अरबाज आणि सोहेलच्या मोठ्या मुलापर्यंत येऊन थांबलं आहे. शाळेत मुलीची मस्करी केल्यामुळे भडकल्या स्मृती इराणी, दिलं जशास तसं उत्तर
…म्हणून भावाच्या दुसऱ्या लग्नाला अल्लू अर्जुन गेला नाही काही दिवसांपूर्वी अर्पिताचा मुलगा आहिलसोबत मजा मस्ती करतानाचा व्हिडिओ सलमानने शेअर केला होता. आता त्याने बहीण अलवीरा आणि सोहेल, अरबाजची मुलं अरहान, अयान आणि निर्वानसोबत मजेशीर खेळ खेळतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात चौघांसोबतच घरातले इतर सदस्यही खूप एन्जॉय करताना दिसत आहेत. सलमान अयान आणि अरहानसोबत हाताला मारायच खेळ खेळल्यानंतर तो अरहान आणि निर्वानला हा खेळ खेळायला सांगतो. यात तो रेफ्रीची भूमिका पार पाडताना दिसत आहे. दोघांमध्ये खेळ रंगत असताना तो हळूच तिकडून काढता पाय घेतो आणि दोघं तो मजेशीर खेळ खेळण्यात आणि मस्तीत भांडणात रंगून गेलेले दिसतात.
सलमानला लहान मुलं आवडतात हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. त्यातही आपल्या भाच्यांवर त्याचं विशेष प्रेम आहे. सलमान त्याची बहीण आहिलसोबत अनेकदा वेळ घालवताना दिसतो. त्या दोघांचं नातंही फार सुंदर आहे. सलमानच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो ‘दबंग ३’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमानंतर तो संजय लीला भन्साळीच्या इंशाअल्लाह आणि साजिद नाडियाडवालाच्या ‘किक २’ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. VIDEO : बिचुकलेचं पितळ उघडं, आणखी एका गुन्ह्यात अडकला