मुंबई, 23 जून- अभिनेत्री लिसा रे सध्या झगमगत्या दुनियेपासून लांब असली तरी सोशल मीडियावर मात्र ती बरीच सक्रिय असते. सध्या लिसा तिच्या जुळ्या मुलींच्या फोटोसेशनमुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच तिच्या दोन्ही मुली वर्षाच्या झाल्या. यावेळी लिसाने दोघींचे नऊवरी साडीतले फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये तिच्या दोन्ही मुली सोलेल देवी आणि सूफी राणी फारच क्यूट दिसत आहेत यात काही प्रश्नच नाही. दोघींचे नऊवारी साडीतले फोटो तुफान व्हायरल होत आहेत. आपल्या मुलींचे फोटो शेअर करताना लिसाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हा आमचा पहिला वाढदिवस आहे. आज मावशी प्रीता सुखटणकर आणि काका एसकेसोबत आमची सकाळ फार चांगली गेली. त्यांनी आज आम्हाला महाराष्ट्रीयन मुलींसारखं तयार केलं.’ …म्हणून भावाच्या दुसऱ्या लग्नाला अल्लू अर्जुन गेला नाही
शाळेत मुलीची मस्करी केल्यामुळे भडकल्या स्मृती इराणी, दिलं जशास तसं उत्तर याशिवाय तिने लिहिले की, ‘आम्हाला आमच्या मित्र- मैत्रिणींकडून अनेक भेटवस्तू मिळाल्या. शेअरिंग आणि केअरिंगचा काय अर्थ असतो? कारण आई नेहमीच हे वाक्य बोलत असते. म्हणून मी माझ्या बहिणीकडून माझी भेटवस्तू परत घेतली.’ लिसा सरोगसीच्या मदतीने गेल्या वर्षी आई झाली. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. तिने एका मुलाखतीत म्हटलं की, ‘काम, स्वतःचा सांभाळ, प्रवास, सार्वजनिक आयुष्य, कुटुंब. माझं आयुष्य एक साहसी आहे. आता मी माझ्या मुलींबद्दल फार उत्साही आहे.’ लिसाने २००९ मध्ये कॅन्सरवर उपचार सुरू केले होते. २०१० मध्ये तिला कॅन्सरमुक्त घोषित करण्यात आलं होतं. तर २०१८ मध्ये सरोगसीतून लिसा दोन मुलींची आई झाली. VIDEO: अरबाज- सोहेलच्या मुलांमध्ये भांडण लावून सलमान झाला वेगळा
याबद्दल बोलताना लिसा म्हणाली होती की, ‘माझा संघर्ष आणि त्यातून मिळालेलं यश सर्वांसोबत शेअर करायला मला आवडेल. कॅन्सरवर उपचार घेताना मला अनेकांचा पाठिंबा मिळाला, ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. हे अनुभव सांगायला मला आवडतात. माझी कथा दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी मी अपेक्षा करते.’ VIDEO : बिचुकलेचं पितळ उघडं, आणखी एका गुन्ह्यात अडकला