जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / शाळेत मुलीची मस्करी केल्यामुळे भडकल्या स्मृती इराणी, दिलं जशास तसं उत्तर

शाळेत मुलीची मस्करी केल्यामुळे भडकल्या स्मृती इराणी, दिलं जशास तसं उत्तर

शाळेत मुलीची मस्करी केल्यामुळे भडकल्या स्मृती इराणी, दिलं जशास तसं उत्तर

smriti irani माझ्या मुलीने घरी आल्यावर तो फोटो डिलीट करण्याची विनंती केली. याबद्दल तिला विचारलं असता तिने घडलेला प्रकार सांगितला. तिच्या डोळ्यातले अश्रू मला दिसले नाही आणि मी तो फोटो डिलीट केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 जून- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. याशिवाय त्या सोशल मीडियावर सडेतोड उत्तर देण्यासाठीही ओळखल्या जातात. अनेकदा त्या स्वतःचेच मजेशीर फोटो शेअर करतात आणि त्यावर इतरांसोबत स्वतःही हसतात. पण यावेळी मात्र तसं काही झालं नाही. स्मृती यांनी मुलही जोइश इरानी (Zoish Irani) सोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर केल्यानंतरचा अनुभव स्मृती यांनी इन्स्टाग्रामवर सांगितला. इन्स्टाग्रामवर स्मृती यांनी मुलीसोबतचा फोटो शेअर केला होता. यानंतर जोइशच्या वर्गातील काही मुलांनी तिच्या लुक्सची थट्टा उडवली. जोइशने जेव्हा ही गोष्ट आईला सांगितली जेव्हा स्मृती यांनी इन्स्टाग्रामवरील फोटो डिलीट केला. यानंतर स्मृती यांनी मुलीसोबत अजून एक फोटो शेअर करत म्हटलं की, ‘मी काल मुलीसोबतचा एक सेल्फी शेअर केला होता. पण आज मी तो फोटो डिलीट केला. कारण तिच्या वर्गातील एका मुर्ख मुलालने तिच्या लुक्सची थट्टा उडवली. एका ‘झा’ नावाच्या मुलाने तिच्या लुक्सची मस्करी केली. एवढंच नाही तर त्याने त्याच्या मित्रांनाही तिच्या लुक्सची थट्टा उडवायला सांगितली.’ …म्हणून भावाच्या दुसऱ्या लग्नाला अल्लू अर्जुन गेला नाही

जाहिरात

स्मृती इरानीने पुढे लिहिले की, ‘माझ्या मुलीने घरी आल्यावर तो फोटो डिलीट करण्याची विनंती केली. याबद्दल तिला विचारलं असता तिने घडलेला प्रकार सांगितला. तिच्या डोळ्यातले अश्रू मला दिसले नाही आणि मी तो फोटो डिलीट केला. पण त्यानंतर मला कळलं की असं करून मी त्यांना प्रोत्साहनच दिलं आहे. मिस्टर झा, माझी मुलगी एक प्रशिक्षित खेळाडू आहे. लिम्का बुक्समध्ये तिचा रेकॉर्ड आहे. कराटेमध्ये सेकंड डॅन ब्लॅक बेल्ट आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने दोनदा कांस्य पदक मिळवलं आहे. ती एक गोड मुलगी आणि खूप सुंदर दिसते. तुला पाहिजे तेवढा त्रास दे. ती पुन्हा लढेल. ती जोइश इरानी है आणि तिच्या आई असल्याचा मला अभिमान आहे.’ VIDEO : बिचुकलेचं पितळ उघडं, आणखी एका गुन्ह्यात अडकला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात