मुंबई, 06 जानेवारी: अनेक सेलिब्रिटी नवीन वर्षाची सुरुवात विविध पद्धतीने करत आहेत. काही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्टी करतात तर काही सेलिब्रिटी मंदिरांना भेट देत देवाचे आशीर्वाद घेणं पसंत करतात. नवीन वर्षात अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आपल्या मुलीसोबत वृंदावनमधील मंदिरांना भेट देताना दिसले होते. या दोघांचं सगळीकडेच कौतुक होत असताना आता विकी कौशल आणि कतरिना कैफ सुद्धा एका मंदिराला भेट द्यायला गेले आहेत. या जोडप्याने मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट देत गणपतीचं मनोभावे दर्शन घेतलं आहे. या जोडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बी-टाऊनचे प्रसिद्ध जोडपे विकी कौशल आणि कतरिना कैफ सध्या एकमेकांसोबत खूप वेळ घालवत आहेत. लग्नानंतर हे जोडपे आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसतात. नुकतेच हे लव्ह बर्ड्स नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी रणथंबोरला गेले होते. आता वर्षाच्या शुभारंभासाठी ते मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आले आहेत. विकी आणि कतरिनाने त्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात गणपती पूजन करून केली आहे. त्याचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये विकी आणि कतरिना व्यतिरिक्त विकीची आई वीणा कौशल देखील दिसत आहे. हेही वाचा - Priya Bapat: तब्बल 20 वर्षांनी प्रिया बापट पोहचली ‘त्या’ ठिकाणी; पोस्ट शेअर करत दिला आठवणींना उजाळा व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये विकी आणि कतरिना साध्या कपड्यात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असल्याचे दिसले. त्यांच्या मागे भक्तांची लांबच लांब रांग दिसत आहे. श्री सिद्धिविनायक मंदिरातील विकी आणि कतरिनाच्या छायाचित्रांनी चाहत्यांची मने जिंकली.
विराट कोहली, अनुष्कानंतर विकी कतरीनाने मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहे. हिरवी सलवार कुर्ता, पांढरा सदरा असा पोशाख या दोघांनी परिधान केला होता. यावेळी विकीची आई वीणादेखील उपस्थित होत्या. यावेळी दोघांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतले. विकी कौशल आणि कतरिना कैफचे मंदिरातील फोटो पाहून चाहते त्यांच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे काही चाहत्यांना गणपती दर्शनाचा अर्थ वेगळ्या पद्धतीने समजला. या फोटोंवर एका यूजरने लिहिले की, ‘कतरिना सासूसोबत मंदिरात, गुड न्यूज आहे का?’ आपल्या आवडत्या जोडप्याबद्दल प्रेम दाखवताना एका यूजरने लिहिले की, ‘गणपती बाप्पा माझ्या आवडत्या जोडप्याला नेहमी आनंदी ठेव.’
राजस्थानमधील सवाईमाधोपूर येथे 9 डिसेंबर 2021 रोजी विकी- कतरिनाने लग्न केले होते. पण त्याच्या खासगी स्वरुपाच्या लग्नसोहळ्याचे किस्से आजही चर्चेत असतात. कतरीना नुकतीच ‘भूत पोलीस’ चित्रपटात दिसली होती तर विकी कौशल ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात दिसला आहे.