जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Priya Bapat: तब्बल 20 वर्षांनी प्रिया बापट पोहचली 'त्या' ठिकाणी; पोस्ट शेअर करत दिला आठवणींना उजाळा

Priya Bapat: तब्बल 20 वर्षांनी प्रिया बापट पोहचली 'त्या' ठिकाणी; पोस्ट शेअर करत दिला आठवणींना उजाळा

प्रिया बापट

प्रिया बापट

प्रिया बापट एका खास ठिकाणी गेली आहे. या जागेशी तिचं खास नातं आहे. तिने याविषयी एक व्हिडीओ शेअर केलाय जो आता चांगलाच व्हायरल होतोय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 06 जानेवारी: मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून प्रिया बापटला ओळखले जाते. अनेक चित्रपट, मालिका, नाटक आणि वेब सीरिजमध्ये काम करून तिने अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. प्रिया बापट ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती कायमच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर करत असते. नुकतंच प्रिया बापटने तिच्या आयुष्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. प्रिया बापटचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. प्रिया बापट ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. अनेकदा ती विविध पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो आता  चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रिया कोकणातील एका निसर्गरम्य ठिकाणी पोहचली आहे. तिथे प्रिया मस्त मज्जा करताना दिसत आहे. ती रस्त्याने धावतेय, पारंब्याशी खेळतेय तर झाडावर देखील चढली आहे. हेही वाचा - Abhidnya Bhave: लग्नाच्या पहिल्या वर्षातच नवऱ्याला कॅन्सर; एकमेकांना खंबीर साथ देत पूर्ण केली सुखी संसाराची इतकी वर्षे प्रिया उगाच फिरायला कोकणात गेली नाहीये तर तीचं कोकणाशी एक खास नातं आहे. प्रियाने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या नात्याचा उलगडा केला आहे. तिने या व्हिडीओखाली लिहिलंय कि, ‘माझे आई -बाबा मूळचे कोकणातले. आई राजापुरची आणि बाबा देवगडचे. त्यामुळे लहानपणी आमच्या प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही कोकणात असायचो. चुलीवरचा मेतकुट भाताची न्याहारी, झाडावर चढून जांभळं, कैऱ्या चोरणे, दुपारी पत्ते खेळणे, संध्याकाळी गुळ-दाणे सोबत घेऊन पेडावर जाणे, रात्री अंगणात झोपून चांदण्या पाहणे.’

जाहिरात

तिने पुढे म्हटलंय कि, ‘२० वर्षांनी राजापूरला गेले. जिथे आईचा जन्म झाला, ती मोठी झाली. माझं बालपणं पुन्हा जगले.’ असं प्रियाचं कोकणाशी खास नातं आहे. प्रिया त्या ठिकाणी पुन्हा येऊन फारच खुश झालेली दिसत आहे. या ठिकाणी जाऊन प्रियाने बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. तिने ते सगळं पुन्हा केलं जे लहानपणी ती करायची. प्रियाचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना देखील चांगलाच भावला आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी ‘किती सुंदर’, ‘ज्यांचं बालपण कोकणात गेलं आहे ते लकी असतात ’ अशा कमेंट केल्या आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

प्रिया बापट मागच्या वर्षात फारशी कुठे झळकली नाही.  ती ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटकात व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे, अशी चर्चाही रंगली आहे. आता प्रियाला नवीन भूमिकेत पुन्हा पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात