मुंबई, 26 सप्टेंबर: अभिनेत्री हेमांगी कवी कायम चर्चेत असते. प्रत्येक विषयावर आपलं रोखठोक मत ती मांडत असते. तिने अनेक मराठी सिनेमा, मालिका तसेच नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. हेमांगी कवी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे फोटो सोशल मीडियावरून शेअर करत असते तसेच आगामी प्रोजेक्ट बद्दल माहिती देत असते. आजपासून नवरात्रौत्सवाची सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त मराठी कलाकार चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. नुकतेच हेमांगी ने देखील चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्या शुभेच्छा बघून चाहते काहीसे संभ्रमात आहेत. हेमांगी कवी तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. कुठल्याही विषयावर ती आपलं मत मांडते. आजही नवरात्रीच्या शुभेच्छा देताना हेमांगीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. हे फोटो पोस्ट करताना कॅप्शन लिहिलंय कि, “काल मला माझी दुर्गा भेटली.दगड मातीच्या मूर्तींपेक्षा मी माणसांमध्ये देव शोधते आणि मला भेटतात ही.’’ पुढे तिने म्हटलंय कि, ’’ मी आणि रवी जाधव सर एकाच कॉलेज चे, जे जे चे.रवी सर माझे सीनियर. २००८ ला माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी धुडगूससाठी रवी सरांनी campaigning केलं होतं ते थेट आता एकत्र काम करायचा योग जुळून आला आणि काय कमाल योग जुळून आलाय. रवी सरांच्या आगामी web series मध्ये मी जिच्यासोबत काम करतेय ती माझ्यासाठी दुर्गाच आहे. एका अर्थी आज मी जिथे आहे ते तिच्या मुळेच! योग्य वेळ आल्यावर सांगेनच कसं ते! पण ज्याची कल्पना ही केलेली नसते साधं स्वप्न ही पाहिलेलं नसतं जेव्हा ते आपल्या समोर उभं राहतं तेव्हा आपलं काय होत असेल ओ?''
ती पुढे म्हणतेय कि, ‘‘ती साक्षात माझ्या समोर उभी होती! कसं? तिला डोळ्यात सामावून घेऊ की खूप बोलू की गप्प बसून नुसतं न्याहाळत राहू? Scene करताना ती माझ्या डोळ्यात बघत होती, हातात हात घेत होती, मला जवळ घेत होती. सीन संपल्यावर मला मिठी मारत होती! आई शप्पथ! प्रश्न पडत होते, Is this real? सांगणार सगळं सांगणार तोपर्यंत…Ravi Sir I owe this to you. Big time. इंडस्ट्रीतले लोक तुम्हांला प्रेमानं, लाडानं ‘देवा’ म्हणतात ना…मी म्हणेन, ‘देवा मी न मागता माझ्या पदरात हे दान टाकलस की रे! काल दिवसाची सुरवात देवीच्या दर्शनाने झाली तर सांगता इंद्रधनू ने!यालाच देव पावल्याचे संकेत म्हणायचे. घटस्थापना आणि शारदीय नवरात्रीच्या तुम्हांला सर्वांना शुभेच्छा!” हेही वाचा - Sonalee kulkarni : ‘आज ती नसली तरी…’; नवरात्रीत सोनालीला सतावतेय जवळच्या व्यक्तीची आठवण हेमांगीने केलेली पोस्ट ही रवी जाधव दिग्दर्शित नव्या वेबसिरीजबद्दल आहे. रवी जाधव हे सध्या ज्या वेबसिरीजचं दिग्दर्शन करत आहेत त्यात हेमांगी महत्वाची भूमिका साकारत आहे. त्या वेब सिरीजमध्ये हेमांगी ज्या कलाकारासोबत काम करत आहे त्यांच्याबरोबर काम करण्याचं आपलं स्वप्न होतं. ते स्वप्न रवी जाधव यांनी पूर्ण केलं यासाठी हेमांगीने पोस्टमध्ये रवी जाधव यांचे आभारही मानले आहेत.
तसेच ती व्यक्तीच तिच्यासाठी दुर्गास्वरूप आहे’ असंही तिने म्हटलंय. पण ही कलाकार व्यक्ती नेमकी कोण आहे ते काही हेमांगीने सांगितलेलं नाही. म्हणून चाहते संभ्रमात आहेत. हेमांगीने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिच्या सहकलाकाराचा चेहरा दिसत नसल्याने हेमांगीने जिच्याबरोबर काम केले ती अभिनेत्री कोण हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले आहेत. ती अभिनेत्री कोण असेल याचा चाहते अंदाज लावत आहेत.