जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sonalee kulkarni : 'आज ती नसली तरी...'; नवरात्रीत सोनालीला सतावतेय जवळच्या व्यक्तीची आठवण

Sonalee kulkarni : 'आज ती नसली तरी...'; नवरात्रीत सोनालीला सतावतेय जवळच्या व्यक्तीची आठवण

Sonalee kulkarni

Sonalee kulkarni

आज नवरात्रीत सोनालीला सर्वात जवळीच्या व्यक्तीची आठवण येतेय. या व्यक्तीसोबतचा खास फोटो शेअर करत तिने नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  26 सप्टेंबर: आज घटस्थापना झाली आहे. नवरात्रोत्सवाची सगळीकडे धामधूम आहे. नवरात्रीत सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. आज  मराठी कलाकारसुद्धा नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण आजच्या दिवशी तिला एका जवळच्या व्यक्तीची आठवण येतेय. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत या व्यक्तीची नवरात्रीशी जोडलेली आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मराठमोळी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते. मध्यंतरी ती तिच्या लग्नसोहळ्यामुळे चांगलीच चर्चेत आली होती. पण तेव्हा  सोनालीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. सोनालीच्या सर्वात जवळीच्या व्यक्तीचं निधन झालं होतं. तेव्हा सगळ्या चाहते तिच्या दुःखात सहभागी झाले होते. आज नवरात्रीत पुन्हा या व्यक्तीची सोनालीला आठवण येतेय. ती व्यक्ती म्हणजे सोनालीची आजी. सोनाली कुलकर्णीची सर्वात जवळची व्यक्ती तिची आजी सुशीला कुलकर्णी आता या जगात नाही. पण तिची आठवण सोनालीला कायम सतावत असते.

जाहिरात

आज नवरात्रीनिमित्त सोनालीने खास आठवण शेअर केली आहे. तिने लिहिलंय कि, ‘‘आज घटस्थापना. माझी आजी घट बसवायची. आज ती नसली तरी मनाच्या देव्ह्यातल्या नवदुर्गां मधे पहिली जागा कायम तिचीच असेल.’’ असं म्हणत तिने सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हेही वाचा - Milind Gawali : ‘माझी आई आता मला…’; नवरात्रीनिमित्त मिलिंद गवळींनी शेअर केली आईची ‘ती’ आठवण नवरात्री निमित्त सोनाली तिच्या आयुष्यातील नवदुर्गा कोण आहेत ते चाहत्यांसोबत शेअर करणार आहे. आता या नवदुर्गांमधील पाहिलं स्थान तिने तिच्या आजीला दिल आहे.

News18लोकमत
News18लोकमत

  सोनालीच्या वर्कफ्रंट  विषयी सांगायचं तर, ती अलीकडेच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.  या भूमिकेसाठी तिचे चांगलेच कौतुक झाले होते. आता सोनाली आगामी काळात ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात महाराणी ताराराणींची भूमिका साकारणार आहे.  ‘हिरकणी’ नंतर तिला आता पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात