मुंबई, 07 जुलै- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आपत्तीजनक वक्तव्य केल्यानंकर बॉलिवूड रॅपर हार्ड कौर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हार्ड कौरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अभिनेता अक्षय कुमार आणि बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने पेट्रोलच्या वाढत्या किंमतीचा उल्लेख केला आहे. तसेच या दोन्ही सेलिब्रिटींवर अश्लिल कमेंट केल्या आहेत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. मात्र यावर कोणत्याच सेलिब्रिटीने आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. हार्ड कौरने एक फोटो शेअर केला. यात तिने अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री आणि चेतन भगत यांसारख्या सेलिब्रिटींनी काँग्रेसच्या काळात वाढत्या पेट्रोलच्या किंमतींवर आवाज उठवला होता. मात्र आता भाजप सरकारद्वारे वाढवण्यात आलेल्या पेट्रोलच्या किंमतींवर सगळे मूग गिळून गप्प बसल्याचं तिने म्हटलं. या फोटोमध्ये सेलिब्रिटींचे जुने ट्वीटचे स्क्रीनशॉट देण्यात आले आहेत. या फोटोसह कौरने बॉलिवूडमध्ये ९० टक्क्याहून जास्त सेलिब्रिटी हे भारतातील सर्वात बेकार लोक असल्याचं तिने म्हटलं आहे. एवढंच नाही तर या पोस्टमध्ये तिने एक शिवीगाळही केली आहे. हार्ड कौरने याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्याविरोधात आपत्तीजनक टिपणी केली होती. यानंतर तिच्याविरोधात देशद्रोह, मानहानी आणि आयटी अक्टअंतर्गत गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले होते. हार्ड कौरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिला सर्वोत्तम परफॉर्मन्ससाठी सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कारही मिळाला आहे. आपल्या सोलो अल्बममधून ओळख निर्माण केलेल्या हार्ड कौर एकेकाळी बॉलिवूडमध्ये सर्वात प्रसिद्ध फिमेल रॅपर होती. सध्या ती कामापेक्षा अशा विवादांमुळेच जास्त चर्चत राहत आहे.
या 4 सेलिब्रिटींनी कपिल शर्मा शोमध्ये जाण्यास दिला स्पष्ट नकार
VIDEO- या मराठमोळ्या अभिनेत्रीचा बेली डान्स पाहून हृतिक झाला अवाक्
VIDEO- विराटच्या चौकारावर अनुष्काने विचारले, ‘फोर का सिग्नल क्या होता है…’
सामन्या दरम्यान पंजाबी गाण्यावर थिरकली अनुष्का शर्मा, पाहा VIDEO
EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







