चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 17 एप्रिल: सबसे कातिल म्हणून महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटील चे कार्यक्रम सध्या दणक्यात सुरू आहेत. नुकत्यात झालेल्या पुण्यातील एका कार्यक्रमात एक वेगळी गौतमी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. नेहमी स्टेजवर आपल्या डान्सनं सर्वांना घायाळ करणाऱ्या गौतमीनं पाटीलनं यावेळी थेट स्टेजवरून खाली उतरत प्रेक्षकांमध्येच एंट्री घेतली. यावेळीच्या कार्यक्रमावेळी महिला वर्ग देखील मोठ्या संख्येनं गौतमीचा डान्स पाहण्यासाठी आल्याचं पाहायला मिळालं. गौतमीनं फिल्मी अंदाजात एंट्री घेतली प्रेक्षकांना आपल्या तालावर नाचावलं. पुण्यातील कार्यक्रमातील गौतमीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील विंझर गावात गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पुरूषांप्रमाणेच महिला वर्ग देखील गौतमीचा डान्स पाहण्यासाठी आला होता. गौतमीच्या कार्यक्रमाला राडा होणार हे समीकरण सध्या सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे पुण्यातील या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तसेच खाजगी बॉडीगार्ड यांचेही नियोजन केलं होतं. तसंच महिला पोलीस देखील गौतमीच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. हेही वाचा - Gautami Patil : गौतमी पाटीलला करायचंय लग्न; पण नवऱ्याकडून आहेत ‘या’ अपेक्षा पुण्याच्या विंझर गावात झालेल्या गौतमीच्या कार्यक्रमात गौतमी नाचता नाचता मध्येच स्टेजवरून खाली उतरली. शाळा- कॉलेजात जाणाऱ्या मुली, लग्न झालेल्या बायका ते म्हाताऱ्या आजी देखील गौतमीचा डान्स पाहण्यासाठी आल्या होत्या. गौतमीनं स्टेजवरून प्रेक्षकांमध्ये एंट्री घेतली. गौतमी खाली उतरताच महिला प्रेक्षकांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला. तर गौतमीसाठी महिला पोलीस देखील सज्ज झाल्या होत्या.
पुण्यातील कार्यक्रमात गौतमी पाटीलचा फिल्मी अंदाज | #gautamipatil #gautamipatildance #pune pic.twitter.com/Ikp7oc4oZa
— News18Lokmat (@News18lokmat) April 17, 2023
स्टेजवरून खाली उतरताच गौतमीनं चंद्रा गाण्यावर ठेका धरला. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आजींच्या गौतमी पाया पडली. आजींनी गौतमीला आशिर्वाद दिले. चंद्रा गाण्यावर बेधुंद नाचणाऱ्या गौतमीच्या जवळ जाण्यासाठी महिलांनी चांगलीच गर्दी केली होती. पुण्यात विंझर गावात मनसे जिल्हा अध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या वाढदिवसानिमत्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तरुणाईने गौतमीचा डान्स पाहण्याच्या नादात खुर्च्या डोक्यावर घेऊन नाचायला सुरवात केली. हा धिंगाणा आवराण्यात वेल्हा पोलिसांना तर दमछाक झाली. तरुणाईला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठचार्ज पण करावा लागला. काही करून तरुणाई काही एकायचे नाव घेत नव्हती म्हणून पोलिसांनाच गौतमीचा हा कार्यक्रम आवरता घ्यावा लागला.