प्रसिद्धी, ट्रोलिंगनंतरही त्याच जिद्दीनं पुन्हा उभी राहिलेली गौतमी पाटील सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
बालपणापासून हालाकिची परिस्थिती पाहिलेल्या आणि फार कमी वयात घराची जबाबादारी घेतलेल्या गौतमी पाटीलनं आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले.
आता गौतमी पाटिल लग्न करतेय म्हटल्यावर तिच्या नवऱ्याकडून अपेक्षा देखील फार मोठ्या असतील असं तुम्हाला वाटलं असेल. लग्नाविषयी असलेल्या अपेक्षा गौतमीनं फार खुलेपणानं सांगितल्या.
"मी आयुष्यात जी परिस्थिती येईल त्याला समोरं जाण्यासाठी त्यात साथ देण्यासाठी मला जोडीदार हवा आहे".