जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / या 'विश्वसुंदरी' अभिनेत्रीला मारायचा पती; 10 वर्षं आहे चित्रपटसृष्टीतून गायब

या 'विश्वसुंदरी' अभिनेत्रीला मारायचा पती; 10 वर्षं आहे चित्रपटसृष्टीतून गायब

या 'विश्वसुंदरी' अभिनेत्रीला मारायचा पती; 10 वर्षं आहे चित्रपटसृष्टीतून गायब

पतीविरोधात मारहाण, अनैसर्गिक सेक्स, छळ अशा तक्रारी नोंदवल्यामुळे ही माजी Miss Universe चर्चेत आली होती. आता 46 व्या वर्षी ती सध्या काय करते? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला असेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्रींच्या खासगी आयुष्याविषयी धक्कादायक माहिती गेल्या काही वर्षांत उघड होत आहे. #MeToo चं वादळ अद्यापही शमलेलं नाही. चित्रपटसृष्टीत जम बसवू इच्छिणाऱ्या आणखी एका अभिनेत्रीविषयी गेल्या काही वर्षांपूर्वी अशाच बातम्या आल्या होत्या आणि तेही पतीने केलेल्या अत्याचारांविषयी तिने तक्रार केल्यानंतर. 1999 मध्ये विश्वसुंदरी किताब मिळवलेली युक्ता मुखी आज (7 ऑक्टोबर) 46 वर्षांची झाली. Yukta Mookhey Birthday  निमित्त पुन्हा एकदा या अभिनेत्रीविषयी चर्चा सोशल मीडियाच होते आहे. गेली 10 वर्षं ती चित्रपटसृष्टीतून गायब आहे. पण मध्यंतरी ती आणि तिच्या पतीविषयीच्या बातम्यांमुळे युक्ता चर्चेत आली होती. युक्ता मुखी 1999 मध्ये मिस इंडिया झाली आणि त्याच वर्षी तिने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. तिथेही तिने मिस युनिव्हर्सचा मुकुट जिंकला. त्यानंतर लगोलग बॉलिवूडच्या अनेक ऑफर्स तिला मिळू लागल्या. सुश्मिता सेननंतर युक्ता मुखीसुद्धा तिच्यासारखीच लोकप्रिय होणार असं लोक म्हणू लागले. वाचा - ‘Superstar Singer’मध्ये 9 वर्षांची प्रीती ठरली अव्वल; जिंकली 15 लाखांची रक्कम 2002 मध्ये तिचा पहिला चित्रपट प्यासा रीलिज झाला. त्यात तिने आफताब शिवसानीबरोबर काम केलं. त्यानंतर 2006 मध्ये कठपुतली नावाचा चित्रपट आला आणि गेला. युक्ताला हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष यश मिळालं नाही. तिने शेवटची फिल्म केली 2008मध्ये मेमसाब नावाच्या या चित्रपटानंतर तिला चित्रपट मिळणं बंद झालं. ती बॉलिवूडमधून गायबच झालं. त्याच वर्षी तिचं न्यूयॉर्कमध्ये असणाऱ्या प्रिन्स तुली नावाच्या बिझनेसमनशी लग्न केलं. युक्ताची उंची 6.1 फूट आहे. या उंचीमुळेच चांगले सिनेमे मिळाले नाहीत, असं म्हटलं जातं. हिंदी चित्रपटातल्या अनेक ‘हीरों’पेक्षा ती उंच आहे. 2008 मध्ये लग्नानंतर ती चित्रपटांपासून लांबच राहिली. तिला एक मुलगाही झाला. अचानक 2013 मध्ये तिने पतीविरुद्ध दाखल केलेल्या पोलीस तक्रारीनंतर पुन्हा एकदा तिचं नाव चर्चेत आलं. घरगुती हिंसाचार, अनैसर्गिक सेक्स, मारहाण, हुंड्यावरून छळ अशा तक्रारी युक्ताने पतीविरोधतच केल्या. वाचा - KBC-11 जिंकायचे होते 7 कोटी; आठव्याच प्रश्नावर शिक्षक झाले नापास मिळाले फक्त… याविरोधात पतीही कोर्टात गेला. अखेर प्रिन्स तुली आणि युक्ता मुखी यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. मुलाचा ताबा युक्तीला मिळाला. तिने पतीविरोधत केलेले आरोप कोर्टाबाहेरच मिटवले असं म्हणतात. युक्ता सामाजिक आयुष्यात फारशी दिसत नाही. ती सोशल मीडियावरसुद्धा अॅक्टिव्ह नाही. एकेकाळची विश्वसुंदरी कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरते, पतीविरोधात तक्रार करते आणि प्रकाशझोतातून बाजूला राहते. आता 46 व्या वर्षी ती सध्या काय करते? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला असेल. याही बातम्या वाचा : RBI चा मोठा निर्णय; ATMमधून नाही निघणार 2000 रुपयांची नोट, कारण…! धोनीनं क्रिकेट सोडलं? VIRAL VIDEOमुळे चाहत्यांना पुन्हा पडला प्रश्न नेहरुंनी 68 वर्षांपूर्वी लावलं होतं झाड, आता त्याच ‘आरे’तील झाडांवर कुऱ्हाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood
  • First Published :
जाहिरात
जाहिरात