'Superstar Singer'मध्ये 9 वर्षांची प्रीती ठरली अव्वल; जिंकली 15 लाखांची रक्कम

'Superstar Singer'मध्ये 9 वर्षांची प्रीती ठरली अव्वल; जिंकली 15 लाखांची रक्कम

9 वर्षांच्या प्रीतीचा सुमधूर आवाज ऐकून तुम्ही व्हाल थक्क, सुपरस्टार सिंगरमध्ये मारली बाजी.

  • Share this:

मुंबई, 07 ऑक्टोबर: टीव्हीवर अनेक रियालिटी शो येत असतात. त्यापैकी सगळ्यांच्या आकर्षणाचा आणि खास प्रेक्षकांच्या आवडीचे म्हणजे लहान मुलांचा गाण्याचा कार्यक्रम. मग तो सा रे ग म प असो किंवा वॉईस ऑफ सिंगर असो किंवा सुपरस्टार सिंगर. हे रियालिटी शो टीआरपीच्या मीटरवर कायमच अव्वल असतात. यंदाच्या सिझनमध्ये सुपरस्टार सिंगर ठरली आहे 9 वर्षांची प्रिती.

सुपरस्टार सिंगर या गाण्याच्या शोसाठी देशभरातून अनेक मुलं आली होती. त्यापैकी सुपरस्टार सिंगर ठरण्याचा मान 9 वर्षांच्या प्रिती भट्टाचार्जीने पटकवला आहे. रविवारी झालेल्या ग्राण्ड फिनालेदरम्यान सगळ्या स्पर्धकांनी उत्तम परफॉर्मन्स सादर केला. त्यांचा परफॉर्मन्स पाहून प्रेक्षकही थक्क झाले. 6 ऑक्टोबरला महासोहळ्यात 6 स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. प्रिती भट्टाचार्जी, मौली, स्नेहा शंकर, हर्षित नाथ, अंकोना मुखर्जी आणि निष्ठा शर्मा हे स्पर्धक सहभागी झाले होते. चार टीमचे कॅप्टन नितिन कुमार, सलमान अली, ज्योतिका तंगरी और सचिन कुमार वाल्मीकी यांनी गाणी गायली. या महाअंतिम सोहळ्याचं परीक्षण म्हणून गायक हिमेश रेशमिया अलका याग्निक आणि जावेद अली यांनी केलं.

9 वर्षांच्या सुंदर मुलीने परीक्षक आणि प्रेक्षकांची मन आपल्या सुमधूर आवाजाने जिंकून घेतली. प्रीतीचा परफॉर्मन्स सुरुवातीपासूनच उत्तम असल्यानं ती जिंकेल असा विश्वास प्रेक्षकांचा होता.

सुपरस्टार सिंगरच्या जागी आता इंडियन आयडल सिझन 11 सुरु होत असल्याची चर्चा आहे. या शोमध्ये अनु मलिक, विशाल डडलानी आणि नेहा कक्कर जज असतील अशी माहिती मिळत आहे. या शोसाठी ऑडिशन सुरू झाल्या आहेत.

VIDEO : अमिताभ बच्चन यांनी घेतलं दुर्गा देवीचं दर्शन

First Published: Oct 7, 2019 02:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading