KBC-11 जिंकायचे होते 7 कोटी; आठव्याच प्रश्नावर शिक्षक झाले नापास मिळाले फक्त...

KBC-11 जिंकायचे होते 7 कोटी; आठव्याच प्रश्नावर शिक्षक झाले नापास मिळाले फक्त...

आठव्याच प्रश्नावर शिक्षकाला बाहेर पडावं लागल्यानं 10 हजारांवर मानावं लागलं समाधान.

  • Share this:

मुंबई, 07 ऑक्टोबर: कौन बनेगा  करोडपतीच्या 11 व्या सीझनमध्ये  7 कोटी जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शिक्षकाला 10 हजार रुपये घेऊन बाहेर बाहेर पडावं लागलं. भोपाळमधील सरकारी विद्यालयाच्या या शिक्षकाला 8 वा प्रश्न 80 हजारांसाठी विचारण्यात आल्या. जनरल नॉलेजवर हा प्रश्न होता तरीही त्यांना उत्तर देता आलं नाही. त्यामुळे शिक्षकाला खेळ सोडावा लागला. विशेष म्हणजे फास्टेस्ट फिंग फर्स्ट राउंडमधील प्रश्नांची उत्तर देऊन जेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसण्यासाठी शिक्षकाची निवड झाली त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणाऱ्या या शिक्षिकाचं नाव अरुण मिश्रा असं आहे. ते सरकारी विद्यालयात शिकवतात आणि तिथल्या विद्यालयासाठी सोयीसुविधांसाठी त्यांनी खेळात जिंकलेल्या पैशांचा उपयोग करणार असल्याचं म्हटलं होतं. 7 कोटी जिंकले तर मी विद्यालयासाठी वापरेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मात्र जनरल नॉलेजवर असणाऱ्या 8व्या प्रश्नावरच त्यांना खेळ सोडावा लागला आणि 10 हजारांवर त्यांना समाधान मानावं लागलं.

80 हजरांसाठी काय विचारला होता प्रश्न

प्रश्न- जेव्हा जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव संसदेत ठेवला होता तेव्हा काश्मीरमधील एका खासदारांचे भाषण खूप लोकप्रिय झाले. भाजपच्या खासदाराने आपल्या वास्तविक जीवनातील अनुभवांवरून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. या खासदारांने कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली?

अरुण मिश्रा यांचं उत्तर- मिझोराम

योग्य उत्तर- लडाख

जामयांग सीरिंग नामग्याल असं या भाजप खासदाराचं नावं होते. त्यांनी लडाख लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली.

<iframe width="1280" height="720" src="https://www.youtube.com/embed/KYgF53noEe4" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>

हॉटसीटवर येताना असा होता उत्साह

अरूण मिश्रा यांनी फास्टेस्ट फिंग फर्स्ट राउंडमध्ये बाजी मारल्यानंतर वाऱ्याच्या वेगानं धावत अमिताभ बच्चन यांनी जाऊन मिठी मारली. 'मला चंद्रयान माझ्या अंगावर उतरलंय का असं दोन क्षणांसाठी मला वाटलं',असं अमिताभ यांनी यावेळी म्हटलं. त्यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या जीवनावर आधारित व्हिडिओ दाखवला. या खेळात 7 कोटी जिंकले तर मी शाळाले देईन असं अरुण मिश्रा यांनी सांगितलं. त्यांची जिद्द पाहून अमिताभ यांनाही आशा वाटली मात्र त्यांना 8 व्या प्रश्नावरच बाहेर पडावं लागलं.

अरुण मिश्रा यांना विचारण्यात आलेले इतर प्रश्न काय होते पाहा

प्रश्न- करतारपूरचा संबंध गुरूनानक यांच्या जीवनातील कोणत्या घटनेशी संबंधीत आहे?

उत्तर- मृत्यू

प्रश्न- विटामिन सीचं दुसरं नाव काय आहे?

उत्तर- एस्कॉर्बिक अॅसिड

प्रश्न- संगणकात कंट्रोल अल्ट कशासाठी वापरण्यात येते?

उत्तर- प्रिंट काढण्यासाठी

प्रश्न - लोकशाही या शब्दाला या पैकी कोणता शब्द वापरला जातो?

उत्तर- जम्हूरियत

VIDEO : अमिताभ बच्चन यांनी घेतलं दुर्गा देवीचं दर्शन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2019 01:01 PM IST

ताज्या बातम्या