नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीनंतर 2000 रुपयांच्या नोटांचं प्रसारण सुरू झालं होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटांचं मिळणं त्यात 2000 एटीएममधून काढले तर त्याचे सुट्टे पैसे मिळणं कठीण होत चाललं आहे. त्यामुळे आता बँका एटीएममधून हळूहळू 2000च्या नोटा बंद करत आहेत. त्यासाठी एसबीआयकडून सुरुवात करण्यात आली आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) छोट्या शहरांमधील एटीएममधून 2000 रुपयांच्या नोटांचे स्लॉट (कॅसेट) काढले आहेत. त्यामुळे नागरिकांची आर्थिक अडचण होत आहे. मोठ्या शहरांमध्ये अद्यार हा निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. या स्लॉटच्या जागी बँका 100, 200 आणि 500 रुपयांच्या स्लॉटमध्ये वाढ करणार आहेत. 2000 नोटा बंद करण्यासाठी बँका टप्प्याटप्प्याने काम करत आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये एटीएममधून 2000च्या नोटा तुम्हाला काढता येणार नाहीत. इतर बातम्या - SBI ची धमाकेदार दिवाळी ऑफर, खरेदीवर मिळणार 1 लाख रुपयांचा फायदा दरम्यान, सरकार 2000 रुपयांच्या नोटाच बंद करत असल्याची अफवा सर्वसामान्यांमध्ये पसरवल्या जात असल्याचं बँकांचं म्हणणं आहे. लोकांना गैरसमज होऊ नये यासाठी हळूहळू एटीएममधून 2000च्या नोटा बंद करण्यात येणार आहेत. एटीएममधून पैसे काढल्यानंतर कोणालाही 2000 रुपयांची नोट मिळणार नाही. जर कोणाला 2000 रुपयांची नोट हवी असेल तर ते ती बँकेतून घेऊ शकतात. दिवाळी हा उत्सव झाल्यानंतर या निर्णयाकडे जास्त लक्ष देण्यात येणार आहे. इतर बातम्या - महाराष्ट्र हादरला! भाजप नेत्यासह कुटुंबावर गोळीबार, 5 जणांचा मृत्यू एटीएममधून 2000 रुपयांची नोट जरी मिळाली तरी बऱ्याच वेळा त्याचे सुट्टे पैसे मिळणं शक्य होत नाही. त्यामुळे किरकोळ वस्तू घेण्यासाठी अडचणी येतात. मोठ्या नोटांसह मोठं पेमेंट करणं सोपं आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सध्या एसबीआयने याची सुरुवात उत्तर प्रदेशच्या कानपूर विभागातून केली आहे. या प्रकरणाशी संबंधित एसबीआयच्या वरिष्ठ अधिका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास वर्षभरापासून एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नवीन नोटा ठेवत नाही. आता हा स्लॉट काढण्यात येणार असून इतर नोटांचा स्लॉट वाढवण्य़ात येणार असल्याची माहिती आहे. इतर बातम्या - सत्तेसाठी युती आणि युतीसाठी तडजोड? वाचा उद्धव ठाकरे यांची संपूर्ण मुलाखत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.