मुंबई, 07 ऑक्टोबर : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जवळ जवळ तीन महिने क्रिकेटपासून लांब आहे. गेल्या वर्षी वर्ल्ड कप 2019मध्ये धोनीनं अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज दौरा न खेळण्याचा निर्णय धोनीनं घेतला. दरम्यान, एकीकडे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा होत असतांना त्यानं 15 दिवस लष्कारात ट्रेनिंग घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं धोनी क्रिकेटमध्ये कधी कमबॅक करणारा असा सवाल, चाहते विचारत आहे. धोनी क्रिकेटपासून दूर असल्यामुळं तो पुढे काय असा प्रश्नही निर्माण झाला आहे. दरम्यान सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळं धोनीनं क्रिकेट सोडले की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी धोनी बॉलिवूडमध्ये एण्ट्री करत सिनेमात काम करणार असल्याच्या चर्चा होत्या. यात आता धोनी क्रिकेट सोडून फुटबॉल खेळताना दिसत आहे. नुकतेच धोनीनं अभिनेता अर्जुन कपूरसोबत फुटबॉलचा सराव केला. 38 वर्षीय धोनीचे फुटबॉल प्रेम सर्वांना माहित आहे. धोनी स्वत: इंडियन सुपर लीग आपला एक संघ घेतला आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळं वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. वाचा- रोहित शर्माच्या वक्तव्यानं ऋषभ पंतचे करिअर धोक्यात, म्हणाला…
आता थेट पुढच्या वर्षी धोनी करणार पुनरागमन? धोनीनं क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ धोनी दोन दिवसांत सुरू होणाऱ्या विजय हजारे करंडक स्पर्धेतही खेळू शकणार नाही आहे. नोव्हेंबरपर्यंत क्रिकेट खेळणार नसल्यामुळं धोनी आता थेट पुढच्या वर्षी वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे, त्यावेळी पुनरागमन करू शकतो. तसेही झाले नाही तर चाहत्यांना झिम्बाम्वे आणि ऑस्ट्रेलिया विरोधात होणाऱ्या मालिकांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. वाचा- फलंदाजाला बोल्ड झाल्याचं कळालच नाही, पाहा शमीचा तुफानी इनस्विंग वर्ल्ड कपमध्ये खेळणार का धोनी? धोनीनं अखेरचा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाविरोधात खेळला होता. त्यानंतर धोनीनं एकही टी-20 सामना खेळलेला नाही. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं विचार केल्यास धोनीची जागा ऋषभ पंत घेऊ शकतो. पण पंतची खेळी पाहता, टीम इंडियाला धोनीसारख्या अनुभवी खेळाडूची गरज भासेल. आयपीएलचा पुढचा हंगाम खेळणार धोनी आयपीएलमधील संघ चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांनी महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत मोठे विधान केले आहे. धोनीनं कर्णधार म्हणून चेन्नई सुपरकिंग्ज संघाला तीन वेळा विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळं येत्या आयपीएल हंगामात धोनी खेळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सगळ्या प्रकरणावर सीएसकेचे मालक श्रीनिवासन यांनी मोठा खुलासा केला आहे. श्रीनिवासन यांनी धोनीच पुढच्या हंगामात कर्णधार असल्याचे स्पष्ट केले आहे. टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत धोनी आयपीएलच्या हा हंगाम खेळणार असल्याचे सांगितले. वाचा- विमान नाही, पक्षी नाही; हा तर निघाला सर जडेजा! अफलातून कॅचचा VIDEO VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं