मुंबई, 9 जुलै- ‘बिग बॉस’(Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो समजला जातो. प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने बिग बॉसच्या नव्या पर्वाची वाट पाहात आहेत. काही दिवसांपूर्वीच बिग बॉसचा नवा पर्व म्हणजेच ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) आपल्या भेटीला येणार आहे हे आपल्याला समजलं आहे. यावेळी शोमध्ये अनेक ट्वीस्ट पाहायला मिळणार आहेत. तत्पूर्वी बिग बॉस 15 बद्दल आणखी एक महत्वाची बाब समोर आली आहे. जाणून घेऊया काय आहे हा नवा ट्वीस्ट.
कलर्स वाहिनीवर प्रसारित होणारा ‘बिग बॉस’ शो प्रेक्षकाकडून खुपचं पसंत केला जातो. हा शो 3 महिन्यांचा असतो. मात्र यावेळी खूप मोठा ट्वीस्ट येणार आहे. मेकर्सच्या निर्णयानुसार हा शो आत्ता 3 नव्हे तर तब्बल 6 महिने दाखवला जाणार आहे. मात्र सुरुवातीला 6 आठवडे हा शो OTT प्लॅटफॉर्म म्हणजेच voot वर रिलीज केला जाणार आहे. OTT वर या शोचं प्रिमियर केलं जाणार आहे. तसेच या शोला आत्ता ‘बिग बॉस ओटीटी’ म्हटलं जाणार आहे.
(हे वाचा:क्रिती सेनॉन आई होणार? व्हिडीओ पाहून तुम्ही देखील चक्रावून जाल )
‘बिग बॉस 15’ पाहिले 6 आठवडे OTT वर दाखवण्यात येणार. त्यांनतर हळूहळू टीव्हीवर शिफ्ट करण्यात येणार आहे. यावेळी बिग बॉसमध्ये ‘जनता फॅक्टर’ दिसून येणार आहे. म्हणजेच सर्वसामन्य नागरिकांचा यामध्ये समावेश असणार आहे. यावर्षी बिग बॉसचं नाव बदलून ‘बिग बॉस ओटीटी’ असं ठेवण्यात येणार आहे. यावर्षी प्रमाणे गेल्यावर्षीसुद्धा नाव बदलून ;बिग बॉस 2020’ असं करण्यात आलं होतं.
(हे वाचा:‘ब्लाऊज घालायला विसरलीस का?’ Bold ड्रेसमुळे शिल्पा शेट्टी होतेय ट्रोल )
यावेळी बिग बॉसमध्ये अनेक ट्वीस्ट पाहायला मिळणार आहेत. टीव्हीवरील प्रसिद्ध कलाकरांसोबत सर्वसामन्य लोकांचाही यामध्ये समावेश होणार आहे. तसेच काही सेलेब्रेटी कपल्सचासुद्धा यामध्ये समावेश असणार आहे. त्यामुळे हा सिझन पाहायला खुपचं रंजक असणार आहे. तसेच Voot चे प्रमुख असणारे फर्जद पालिया यांनी बिग बॉसबद्दल बोलताना म्हटलं आहे, ‘बिग बॉसने या सिझनमध्ये खुपचं मोठी लोकप्रियता मिळवली आहे. त्याचंबरोबर भारतातील सर्वात मनोरंजक शोमध्ये बिग बॉसचा समावेश आहे. त्यामुळ बिग बॉस 15 ची सुरुवात ओटीटीवर करण हे आमच्या ओटीटी प्लॅटफॉर्मला अधिक भक्कम बनवण्याचाचं प्रयत्न आहे’.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Entertainment, New release, OTT, Tv serial