मुंबई 9 जुलै: ‘हिरोपंती’ (Heropanti) या चित्रपटातून नावारुपास आलेली क्रिती सेनॉन (Kriti Sanon) ही बॉलिवूडमधील आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अगदी कमी कालावधीत तिनं आपल्या नावाचा दबदबा सिनेसृष्टीत निर्माण केला आहे. त्यामुळे अनेकदा चाहत्यांमध्ये तिच्या खासगी आयुष्याविषयी चर्चा रंगताना दिसतात. (Kriti Sanon baby bump) दरम्यान क्रितीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये ती बेबीबंपसोबत दिसत आहे. त्यामुळे क्रिती आई होणार की काय? ही चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.
‘बरेली की बर्फी’, ‘लुकाछुपी’, ‘हाऊसफुल 4’ या लोकप्रिय चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर ती लवकरच ‘मिमी’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ती एका गरोदर स्त्रीची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये या व्हिडीओचीच चर्चा आहे.
‘ब्लाऊज घालायला विसरलीस का?’ Bold ड्रेसमुळे शिल्पा शेट्टी होतेय ट्रोल
It’s nothing like what you’re expecting! Delivering the #Mimi trailer on 13th July! Stay tuned. #MimiTrailer13July@TripathiiPankaj @Evelyn_Edwards1 @SaieTamhankar @aidanwhytock #DineshVijan @Laxman10072 @arrahman @OfficialAMITABH @rohanshankar06 @SamruddhiPorey @MaddockFilms pic.twitter.com/zG1AlKn0Nn
— Kriti Sanon (@kritisanon) July 9, 2021
शाहिद कपूरच्या पत्नीसोबत Online fraud; ऑर्डर केलं कव्हर अन् आलं भलतंच काही...
‘मिमी’ या चित्रपटात क्रिती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून या भूमिकेसाठी तिने तब्बल 15 किलो वजन वाढवलं आहे. या चित्रपटाची कथा एका सरोगेट मदरभोवती फिरताना दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक आणि मनोज पाहवा स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटानंतर क्रिती अक्षयकुमारसोबत ‘बच्चन पांडे’ या चित्रपटातही झळकणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Kriti sanon