जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘ब्लाऊज घालायला विसरलीस का?’ Bold ड्रेसमुळे शिल्पा शेट्टी होतेय ट्रोल

‘ब्लाऊज घालायला विसरलीस का?’ Bold ड्रेसमुळे शिल्पा शेट्टी होतेय ट्रोल

‘ब्लाऊज घालायला विसरलीस का?’ Bold ड्रेसमुळे शिल्पा शेट्टी होतेय ट्रोल

हा व्हिडीओ पाहून “शिल्पा तू ब्लाऊज घालायला विसरलीस का?” असा सवाल करत काही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 9 जुलै**:** शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही बॉलिवूडमधील सर्वाधिक ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. चाळीशीनंतरही ती आपल्या फिट अँड फाईन लुकमुळे चर्चेत असते. अलिकडेच तिने ‘हंगामा 2’ (Hungama 2) या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. यामध्ये तिने परिधान केलेले कपडे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. या प्रमोशनचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Shilpa Shetty video viral) दरम्यान हा व्हिडीओ पाहून “शिल्पा तू ब्लाऊज घालायला विसरलीस का?” असा सवाल करत काही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे.

जाहिरात

उर्वशीला नडला मोबाईलचा अतिवापर; या व्याधीसाठी अखेर करावं लागलं ऑपरेशन शिल्पा शेट्टी हंगामा 2 हा विनोदी चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात तिने परेश रावल यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. सध्या ती या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. यावेळी तिने एक ब्राऊन कलरचा ड्रेस परिधान केला होता. हा बोल्ड ड्रेस पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांनी शिल्पाच्या या ग्लॅमरस अंदाजाचं कौतुक केलं. लक्षवेधी बाब म्हणजे अलिकडेच हॉलिवूड अभिनेत्री किम कदार्शियन हिनं देखील अशाच प्रकारचा ड्रेस एका पुरस्कार सोहळ्यात घातला होता. त्यामुळे काही चाहत्यांनी तिची तुलना किमसोबत केली. शाहिद कपूरच्या पत्नीसोबत Online fraud; ऑर्डर केलं कव्हर अन् आलं भलतंच काही…

null

परंतु नेटकऱ्यांनी मात्र शिल्पाची खिल्ली देखील उडवली आहे. “ब्लाऊज घालायला विसरलीस का? इतके पैसे असून काय फायदा पुरेस कपडे देखील तुझ्या अंगावर नाहीत.” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काही ट्रोलर्स तिची खिल्ली उडवत आहेत. अर्थात या ट्रोलिंगवर शिल्पानं अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात