Promo Video: जेव्हा गरिबीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुलाचा मृत्यू होतो

डॉक्टरांनीही पैशांशिवाय उपचार करण्यार नाही असं स्पष्ट सांगितलं. उपचारांअभावी चिमुकला गंगाधर आजारपणातून बरा होऊ शकला नाही आणि त्याने या जगाचा निरोप घेतला.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2019 11:58 AM IST

Promo Video: जेव्हा गरिबीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुलाचा मृत्यू होतो

मुंबई, 04 नोव्हेंबर- बाबासाहेबांचा जीवनपट उलगडणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत भावनिक वळण आलय. आईवडील आणि मोठा भाऊ आनंदचं छत्र हरपल्यानंतर बाबासाहेबांच्या आयुष्यातली आणखी एक धक्कादायक घटना म्हणजे मुलगा गंगाधरचं निधन. बाबासाहेब शिक्षणासाठी लंडनला असताना रमाबाईंनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली. मात्र अडचणी काही संपत नव्हत्या. घरी दोन वेळच्या जेवणाचीही वानवा असताना लहानगा गंगाधरची तब्येत बिघडते.

डॉक्टरांनी पैशांशिवाय उपचार करण्यार नाही असं स्पष्ट सांगितलं. उपचारांअभावी चिमुकला गंगाधर आजारपणातून बरा होऊ शकला नाही आणि त्याने या जगाचा निरोप घेतला. बाबासाहेब आणि संपूर्ण सकपाळ कुटुंबाला हेलावून टाकणारी ही घटना. लंडनमध्ये बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून रमाबाईंनी गंगाधरच्या निधनाबद्दल बाबासाहेबांना फार उशिरा कळवलं. रमाबाई म्हणजे फक्त त्यांच्या मुलांची नाही तर संपूर्ण समाजाची माऊली होती हे या घटनेतून प्रकर्षाने जाणवतं.

गंगाधरच्या निधनाच्या बातमीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रचंड अस्वस्थ झाले. समान अधिकारांसाठी करावा लागणारा संघर्ष, घरी मदतीचा हातभार लावू शकत नसल्याची खंत, लंडनमध्ये अभ्यासपूर्वक लिहिलेला प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध ब्रिटिश प्राध्यापकांकडून नाकारला जाणं आणि अशातच मुलगा गंगाधरच्या निधनाची बातमी या घटनांनी बाबासाहेबांच्या आयुष्यात उलथापालथ केली. पण बाबासाहेब खचले नाहीत.

हिऱ्याला ज्याप्रमाणे तावून सुलाखून झळाळी मिळते त्याचप्रमाणे या घटनांनी बाबासाहेबांना आणखी खंबीर केलं आणि हाती घेतलेलं कार्य पूर्ण करण्याची उमेद दिली. बाबासाहेबांचा संघर्ष आणि विचार आजही जनमानसात नवी प्रेरणा देतात. हेच मौल्यवान विचार पोहचवण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतून केला जातोय.

Loading...

शाहिद कपूरच्या पावलांवर पाऊल ठेवत ही अभिनेत्री करणार Arrange Marriage

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं WhatsApp अकाउंट झालं हॅक, हॅकर करतोय अश्लील व्हिडीओ

दिल्लीच्या प्रदूषणावर प्रियांका चोप्राची रिअॅक्शन,'इथं राहणं म्हणजे...'

Happy Birthday Tabu: तब्बू अजूनही आहे सिंगल, जाणून घ्या लग्न न करण्याचं कारण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 11:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...