नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : देशाच्या राजधानीत हवा प्रदुषणाच्या समस्येनं रौद्र रूप धारण केलं आहे. गेल्या 24 तासात तब्बल 14 पटींनी प्रदुषणात वाढ झाली आहे. दिल्लीत आता घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. लोकांना श्वास घेण्यात अडचणी येत असून डोळ्यात जळजळ होत आहे. दिल्लीच्या वाढत्या प्रदुषणामुळे फक्त नागरिकच नाही तर सरकार आणि सेलिब्रेटीसुद्धा चिंतेत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने दिल्लीतील वाढत्या प्रदुषणावर सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे. प्रियांका सध्या द व्हाइट टायगर या चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत करत आहे. तिने इन्स्टाग्रामवरून एक फोटो शेअऱ केला आहे. यामध्ये प्रियंकाने चेहऱ्यावर मास्क लावला असल्याचं दिसत आहे. प्रियांकाने प्रदुषणाबद्दल चिंता व्यक्त करताना लिहिलं की, चित्रपटाच्या शूटिंगचा दिवस आहे. सध्या इथं शूटिंग करणं खूप कठिण आहे. या परिस्थितीत इथं राहण्याचा अनुभव कसा असेल याचा विचारही मी करू शकत नाही असं प्रियांकाने म्हटलं आहे.
आमच्याकडे एअर प्युरिफायर आणि मास्क आहे. यासाठी आम्ही आभारी आहे पण ज्यांच्याकडे घरही नाही त्या लोकांसाठी प्रार्थना करा असंही प्रियांकाने म्हटलं आहे. रविवारी दिल्लीतील अनेक भागात हवेचा गुणवत्ता निर्देशांक दिवसात एक हजार तर नोएडा, गाझियाबाद इथं दीड हजार पर्यंत होता. संध्याकाळपर्यंत हे प्रमाण कमी झालं होतं. मात्र, सध्या इथली परिस्थितीत लोकांसाठी धोकादायक आहे. दिल्ली-एनसीआरमधील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. याची गंभीर दखल घेत सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या समितीनं दिल्लीत सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणानं (ईपीसीए) प्रदूषण नियंत्रणासाठी पाच नोव्हेंबरपर्यंत दिल्ली-एनसीआरमधील बांधकामांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. ताज्या आकड्यांनुसार दिल्लीमधील प्रदूषणाची पातळी 1000 अंकांवर पोहचली आहे. दरम्यान, ऊस पडून गेल्यानंतर तो 625 वर पोहचला. ही गोष्ट गंभीर असून आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी प्रदुषणाची पातळी 500 च्या आसपास होती पण हलक्या पावसाने यात वाढ झाली. दिल्लीतील प्रदूषण एवढे जास्त आहे की इंदिरा गांधी विमातळावरून 32 विमानांची दिशा बदलण्यात आली आहे. पाहा PHOTO : मुंबईच नाही तर ही शहरंही पाण्याखाली बुडण्याचा धोका VIDEO : आता म्हणताय येऊ का? अजित पवारांनी कार्यकर्त्यांना बजावलं