मुंबई, 04 नोव्हेंबर: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री तब्बूचा वाढदिवस आहे. तिच्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये तिचं असं एक वेगळ स्थान आहे. आपल्या करियरमध्ये एकापेक्षा एक सुपर सिनेमा तिने अभिनयातून गाजवले. पण तुम्हाला माहीत आहे का? तब्बू आजही सिंगल आहे. तिने अजूनही लग्न केलं नाही. तिच्या आयुष्यातील अनेक गुपितं आजही तिने उलगडली नाहीत. तब्बूने तमिळ, मल्याळम्, हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. आपल्या अभिनयामुळे वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तब्बूही आहे. आतापर्यंत दोनवेळा राष्ट्रीय फिल्म अवॉर्ड पटकावण्याचा मान तिला मिळाला. वयाच्या 14 व्या वर्षी सिनेमात पदार्पण केलं. हम नौजवान हा तिचा पहिला चित्रपट. या चित्रपटामध्ये देवानंद यांच्या मुलीची भूमिका तब्बूने साकारली होती. ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ब्रँडेड घड्याळांचे शौकीन, किंमत ऐकून व्हाल थक्क तब्बूला 48 वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीदेखील तिने विवाहबंधनात अडकण्याचा विचार केला नाही. याबाबत वारंवार तिला प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्यावर तब्बूने स्वत: उत्तर दिलं नाही. साऊथचा जेष्ठ अभिनेता नागार्जुनसोबत तब्बूचं नाव जोडलं जात होतं. नागार्जुनमुळे तब्बूने लग्न न केल्याची चर्चा होती. सिनेमा मॅग्झिनने छापलेल्या वृत्तानुसार तब्बू नागार्जुनच्या अखंड प्रेमात होती. त्याच्यासाठी मुंबईसोडून तब्बू हैदराबादमध्ये शिफ्ट झाली. नागार्जुन आणि तब्बू जवळपास 15 वर्ष एकमेकांना डेट करत होते. इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या काहीतरी बिनसलं आणि नागार्जुन आणि तब्बूच्या नात्यात दुरावा आला. नागार्जुनचं आधीचं लग्न झालं होतं.मात्र तरीही तब्बूवर त्यांचं प्रेम होतं. मात्र आपली पत्नी आणि परिवार सोडून तब्बूसोबत लग्न करण्यास नागार्जुन तयार नसल्यानं त्यांच्यात खटके उडायला लागले आणि त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. तब्बू आजपर्यंत विवाहबंधनात अडकली नाही. तिला प्रत्येकवेळी कारण विचारलं जातं. एका इव्हेंटमध्ये या प्रश्नाचं उत्तर चक्क अजय देवगणने दिलं होतं. ‘तब्बूला आजपर्यंत माझ्यासारखा मुलगा न मिळाल्यानं ती अजूनही अविवाहित आहे’. अजयचं हे मजेशीर उत्तर त्यावेळी जरी प्रेक्षकांना पटलं असलं तरी तब्बूच्या चाहत्यांमध्ये मात्र तब्बू विवाहबंधनात का अडकत नाही हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे तब्बू लग्न न करण्यामागचं रहस्य स्वत: उलगडणार का याचीही उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. VIDEO : आमचा आहे उद्धव ठाकरेंवर डोळा, आठवलेंची अशीही कविता
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.